*चंद्रपूर येथे सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन रूट मार्च.*

0
10

===============================

चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे
दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव 2024 तसेच इद – ए – मिलाद उत्सव 2024 अनुषंगाने चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिल्प स्मारक छोटूभाई पटेल हायस्कूल समोर चंद्रपूर येथून मुख्य मार्गाने रूट मार्च सायंकाळी 06.00 वाजता करण्यात आले असून सदर रूट मार्चला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर शहर चे पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, दुर्गापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लता वाढिवे, पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार हिवसे तसेच चंद्रपूर शहर,रामनगर,दुर्गापूर,पडोली सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अमलदार , गृहरक्षक व एसआरपीएफ पलटून सहभागी या रूट मार्चमध्ये सामील झाले होते.                                                                     
रूट मार्चच्या वेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र भेलावे, चंद्रपूर मनपाचे नगर अभियंता विजय बोरीकर, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी अमोल शेळके, उप अभियंता रवींद्र हजारे तसेच चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे शांतता समिती सदस्य प्रशांत हजबन, मोरेश्वर, खैरे, रेखा धनंजय दानव, महादेव कांबळे,राजू राठोड सह शहरातील इतर विविध विभागाचे पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य या रूट मार्च मध्ये उपस्थित होते.

हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक ते छोटा बाजार चौक ते जटपुरा गेट ते पवन सुत बाजार ते संत कंवरराम चौक पर्यंत काढण्यात आला होता. हा रूट मार्च कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काढण्यात आला होता, हे मात्र विशेष!                                  =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ===============================                कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here