*आमदार सुभाष धोटेंनी केले जिवती च्या त्या मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन.*

0
7

==================================

जिवती (ता.प्र) :–जिवती तालुक्यातील मौजा आंबेझरी (रोडगुडा) येथील शेळ्या चारण्याकरता गेलेल्या दोन युवकांचा तलावातील विहिरीत तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. सोमवारी घडलेल्या या घटनेत निखिल बाबाराव शिंदे वय वर्षे २२ आणि अब्दुल नवाज शेख वय वर्षे २४ या दोन होतकरु मेहनती तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी आज दोन्ही मर्यतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच मंडळ अधिकारी दिलीप पोडे, तलाठी गजानन जाधव व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतकांचे कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी काँग्रेस नेते भीमराव पा मडावी, ताजुद्दीन शेख, सिताराम मडावी , तिरुपती पोडे, रसूल शेख, शिवाजी श्रीरामे, नागोराव देवकते, बालाजी गूडमेवाड, पंढरी मददेवाड, गणेश शेटकर, शेख अब्बास अली, दत्ता मंदेवाड, बंडू राठोड, प्रकाश शिंदे, दिगंबर ढाले यासह जिवती काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.    ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here