यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र तर्फे प्रेषित जयंतीनिमित्त चंद्रपूर येथे रक्तदान शिबीराला भरपूर प्रतिसाद, रेकॉर्ड ब्रेक 110 रक्त युनिट गोळा*

0
4

=================================

*चंद्रपूर*              =================================
चंद्रपूर येथील जटपुरा गेट परिसरात 99 मार्ट जवळ16 सप्टेंबर  सोमवार रोजी ईद मिलादून्नबी निमित्त युथ मूव्हमेंट आणि एसआईओ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण 110 रक्तदात्यानी रक्त दान केले. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवसेवेला सर्वोत्कृष्ट ठेवन्याची प्रेरणा दिली . त्यांच्या जन्मदिवशी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र मागील 16 वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करीत असते. यावर्षीही या संगठनेकडून राज्यस्तरीय मेगा ब्लड डोनेशन मोहिमेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात तब्बल 50 ठिकानी करण्यात येत आहे.
चंद्रपूरच्या जटपुरा गेटवर सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. सरकारी दवाखान्याचे डॉ.झाडे सर व टीम यांनी रक्त जमा केले.
रक्तदानाला भरपूर माननीय मान्यवरांनी उस्थिती दर्शवली तसेच भेट दिली. त्यात चंद्रपूरचे आमदार  किशोर जोरगेवार , राशीद हुसेन, आणि त्यांचे सहकारी तसेच मनीष तिवारी, आणि त्यांचे सहकारी , राजू कोडे आणि त्यांचे सहकारी, राजू झोडे आणि त्यांचे सहकारी तसेच ऍड फरहात बेग, नाहीद हुसेन,  सरफराज शेख, अजय दुर्गे, इम्रान शेख , मतीन कुरैशी इंजि आमिर आलीयांसारख्या मान्यवरांनी मोठ्या संख्येने  भेट दिली आणि या आयोजनाची सराहना केली.
तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राहील मिर्झा, जुनेद खान, अतिकुरहमान, नबील खान, अमानुद्दीन काजी, सैय्यद मोहसीन, झाकीर अली, डॉ.इर्शाद, नावेद खान, फिरोज खान पठाण, अदनान खान, मोईजुरहमान , रिझवान शिवानी, दानिश मिर्झा , हारून शेख व मोठ्या संख्येने युथ मूव्हमेंटचे आणि SIO चे कार्यकर्ते हाजीर होते.
या शिबिराला यशस्वी बनविण्यासाठी मोहम्मद इकबाल, सादिक खान, रहमान पटेल, फजले माजीद, मोहम्मद रेहान , मजहर अली यांचे मार्गदर्शन लाभला. आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि चंद्रपूर जनतेचे आभार मानले.
=================================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here