==================================
आम आदमी पार्टीचे (आप) युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रावर आपला मजबूत दावा सादर केला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, जनतेच्या सेवा आणि विकासाच्या दृष्टीने त्यांनी चंद्रपूरचे भविष्य उंचावण्याचा संकल्प केला आहे.
सुमित हस्तक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरमध्ये जिल्ह्यामधे आपले समाजकार्य सुरू ठेवले आहे. विशेषत: युवकांच्या समस्या, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य सुविधा, आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर त्यांनी सतत आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव वाढला आहे. युवा नेतृत्व असल्यामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रा मधल्या युवकांना एक नवीन उर्जा निर्माण होत आहे.
” मागील 5 वर्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात फक्त इव्हेंट करण्याचे काम झाले आहे, 200 युनिट वीज बिल मुफ्त करू हा सर्वात मोठा जुमला निघाला आहे व यावर जनतेचा रोष सुद्धा आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर कोणतेही काम झालेले नाही ज्यामुळे बेरोजगार तरुणा मधे रोष आहे. चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत येणारे रस्ते खड्डेमय झालेले आहे. पाणी टंचाई वाळलेली आहे. प्रायव्हेट शाळेत फी बाबत सुरू असलेल्या मनमानी कारभार पद्धत बंद करू व गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहू. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी मी आम आदमी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे. या भागातील समस्यांवर काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे सुमित हस्तक यांनी सांगितले. तसेच, त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, आमदार हा जनतेच्या कामासाठी असतो. जनतेच्या पैशाचा जोरावर मोठे मोठे कार्यक्रम घेणे किंवा इव्हेंट मॅनेजमेंट करण्यासाठी नसतो. चंद्रपूर विधानसभा मधे गेल्या 5 वर्षात एकही नवीन सरकारी शाळा उभारली गेली नाही. चंद्रपूर सरकारी रुग्णालयात पाहिजेत ते उपचार मिळत नाही व माझ्या गोरगरीब जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो. जनतेच्या मनात यावेळी चंद्रपूर क्षेत्राच्या आमदाराच्या विरोधात कौल आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाची विचारधारा आणि लोकहिताचे मुद्दे घेऊन या निवडणुकीसाठी सज्ज आहेत.
आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाने अद्याप चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, सुमित हस्तक यांच्या दाव्यामुळे स्थानिक राजकीय चर्चांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,