Home
Home गडचिरोली *कलाकार हा कधीच माजी होत नाही.विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार*

*कलाकार हा कधीच माजी होत नाही.विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार*

0
77

=================================

*ब्रम्हपूरी येथे लोक कलावंतांचा सत्कार कार्यक्रम*

ग्रामीण भागातील लोककलावंतांनी कलेला जीवंत ठेवण्याचं काम केलं आहे. कलेच्या माध्यमातून फक्त लोकांचं मनोरंजन नाही तर समाजप्रबोधन देखील होत असते. कला ही अजरामर असते. लोकप्रतिनिधी हा कधी तरी माजी होतो. मात्र कलाकार हा कधीच माजी होत नसतो असे अनमोल विचार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडले.

ब्रम्हपूरीचा महाराजा गणेशोत्सव समीतीच्या वतीने लोककलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.   

यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ नामदेव किरसान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते डॉ.देविदास जगनाडे, काॅंग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक गोविंद भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी पं.स.सदस्य थानेशृवर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, शहर काँग्रेस सचिव पुष्पाकर बांगरे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अनुसूचित जाती सेलचे प्रा.डि.के.मेश्राम, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष प्रा.चंद्रशेखर गणवीर, युवक काँग्रेसचे रुपेश बानबले यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, कला जोपासणारा माणुस हा सदैव उत्साही व निरोगी असतो. आपल्या कडे असलेला झाडीपट्टीतील कलाकार हा कुठलीही ट्रेनिंग न घेता कलाकार बनलेला आहे. चित्रपटातील कलाकार मात्र कुठुन ना कुठुन ट्रेनिंग घेऊन रुपेरी पडद्यावर भुमिका साकारत असतात. झाडीपट्टी रंगभुमीची एक वेगळी ओळख देशात आहे. झाडीपट्टीतील कलाकारांच्या कलेला कुठलीही तोड नाही याचा मला अभिमान आहे असेही ते यावेळी म्हणाले. पुरुषांनीच स्त्रीच पात्र केलं आहे हे फक्त झाडीपट्टीत होऊ शकते. ब्रम्हपूरी ही कलाकारांची खाण असुन या नगरीत भव्य अशी कला अकादमी सुरू करण्याचा आपला मानस आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी ब्रम्हपूरी परिसरातील सुमारे १२०० कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश डांगे व राहुल मैंद यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. राजेश कांबळे यांनी केले.        ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here