सुगंधित तंबाखुने भरलेला ट्रकसह 35 लाखाचा माल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी)

0
15

================================

*चंद्रपूर*

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने आंतरजिल्हा सिमेवर प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुने भरलेला ट्रकसह 35 लाखाचा माल जप्त (स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी)
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने जिल्हयात दारुबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी पोलीस स्टेशन सावली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदार यांचेकडुन एक पांढ-या रंगाचा आयशर क्रमांक सी.जी.07-सीक्यु-4602 मधुन महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु व पानमसाला विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैधरित्या वाहतुक करणार असल्याचे खात्रीशिर खबर मिळाल्याने विधानसभा निवडणुक-2024 एस.एस.टी. चेक पोस्ट व्याहाड (बु.) ता.सावली येथे श्री शिवलाल भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, श्री महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि संतोश निंभोरकर, पोहवा/चेतन गज्जलवार, पोहवा/नितेश महात्मे, पोअं/किशोर वैरागडे, पोअं/अमोल सावे, पोअं/प्रफुल्ल गारघाटे, चापोअं/प्रमोद डंभारे यांनी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर येथील कर्मचारी यांचेसह नाकाबंदी करुन नमुद संशयीत वाहनास चेक केले असता त्यामध्ये तारेच्या बंडल खाली लपवुन ठेवलेला महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधीत असलेला मजा 108 सुगंधित हुक्का शिशा तंबाखुचे 200 ग्रॅम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्रॅम वजनाचे 1800 बॉक्स एकुण किंमत 19,93,800/- रु. व जप्त वाहन किं. 15,00,000/- रु. असा एकुण 34,93,800/- रु.चा माल पंचनामा कार्यवाही करुन जप्त करण्यात आला आहे. आरोपी वाहन चालकांविरुध्द पोस्टे सावली येथे अपराध क्रमांक 233/2024 कलम 30 (2), (अ), 26 (2), (i) 26(2)(iv), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006, सहकलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि दिपक कांक्रेडवार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात श्री.महेश कोंडावार पोलीस निरीक्षक, सपोनि श्री दिपक कांकेडवार आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अंमलदारांनी केली आहे. ===================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      =================================        कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here