===================================
विजयाचा संकल्प करत पक्षाच्या धोरणांचा प्रभावीपणे प्रचार करा – आ. किशोर जोरगेवार
भाजपच्या पाच मंडळामध्ये बैठक संपन्न.
भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, विधानसभा प्रमुख प्रमोद कुडू, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष सविता कांबळे, महामंत्री किरण बुटले, बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, वंदना हातगावकर, सायली येरणे, अमोल शेंडे, विश्वजीत शहा, जितेश कुळमेथे, रुपेश पांडे, मुकेश गाडगे, राशिद हुसेन, प्रतिक शिवणकर, मुन्ना जोगी, सलिम शेख, मंगेश अहिरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपला पक्ष न्याय, समानता आणि विकासावर आधारित विचारधारेवर उभा आहे. आपल्या एकतेने हाच विचार समाजात पोहोचवायचा आहे. आपल्या पक्षाच्या धोरणांतून समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल, हे प्रत्येक व्यक्तीला पटवून सांगण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यासारखे एकजुटीने कार्य करणारे कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या पाठीशी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या चेहऱ्यांवर असलेला आत्मविश्वास आणि उत्साह पाहून मला विश्वास आहे की कोणतेही आव्हान आपल्याला थांबवू शकणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. आज भारतीय जनता पक्षाच्या पाचही मंडळांची बैठक संपन्न होत आहे. हे मंडळ खऱ्या अर्थाने पक्ष मजबुतीचे केंद्र आहेत. पक्षाकडून आलेला आदेश या मंडळांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपली जबाबदारी अधिक असणार आहे. या पाचही मंडळांत येणाऱ्या वार्डांमध्ये आपण अनेक विकासकामे केली आहेत. मूलभूत सोयी-सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा मोठा फायदा आपल्याला जमिनीच्या स्तरावर काम करताना होणार असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
या बैठकीला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*