Home
Home चंद्रपूर सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा – आ. किशोर जोरगेवार घुग्घुस येथे भाजप...

सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा – आ. किशोर जोरगेवार घुग्घुस येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न, विजयाचा निर्धार

0
73

===================================

सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा – आ. किशोर जोरगेवार

घुग्घुस येथे भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न, विजयाचा निर्धार

भाजप पक्ष हा संघटनात्मक बांधणीसाठी ओळखला जातो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण मोठ्या संख्येने एकत्रित आले आहात. सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा असून, याच एकतेने पक्षाचा विचार प्रत्येक घरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.                                                                             
या प्रसंगी भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डावले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष शोभा पिदुरकर, पारस पिंपळकर विजय बलकी, विनोद खेवले, सुशांत शर्मा, विजय आगरे, राकेश पिंपळकर, अनिता भोयर, यांची उपस्थिती होती.
पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पक्षाचे धोरण आणि विचार घुग्घुस शहरातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा पक्ष म्हणजे केवळ एका विचारधारेचा प्रवास नसून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी एक तळमळीचा संघर्ष आहे. आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि पक्षाची रीढ आहे. आपला उत्साह, निष्ठा, आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता हीच पक्षवाढीसाठी महत्त्वाची आहे. चंद्रपूरसह घुग्घुस शहराच्या विकासासाठी आजपासून आपण निवडणुकीच्या कामाला लागून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यावेळी भाजपच्या बंगाली कॅम्प मंडळ, बाबुपेठ मंडळ, सिव्हिल मंडळ, बाजार मंडळ, तुकुम मंडळ येथे बैठका पार पडल्या, आणि पूर्ण शक्तीने प्रचार कार्याला लागण्याचा संकल्प पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.        =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===============================            कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here