===============================
*चंद्रपूर*
संगणक / मोबाईलच्या युगात जग झपाट्याने पुढे चालले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सुध्दा परिस्थीतीनुसार जगण्याचा प्रयत्न करीत असतो. मोबाईल हा एक सर्वांचा जिवणाचा महत्वाचा भाग झालेला आहे. आज सर्व सुख सुविधा मोबाईल मध्येच वापरावयास उपलब्ध आहे. घर बसल्यास मित्रांशी सोशल मिडीयावर गप्पा मारणे, बॅकींगचे सर्व व्यवहार करणे हे सर्व करता करता खबरदारी घेणेही तितकीच आवश्यक आहे. अन्यथा आपल्यासोबत ऑनलाईन धोखाधडी होवुन आपण सायबर फ्रॉडला बळी पडु शकता. अशीच एक घटना काही दिवसापर्वी आपल्या चंद्रपुरात घडली आहे.
चंद्रपुरात ई कार्ट कपंनीमध्ये डिलीव्हरी बॉय या पदावर काम करणारा चेतन सोनवणे नावाचा व्यक्ती ला Flipkart कंपनीकडुन एका मोबाईलची कस्टमरला डिलीव्हरी देण्याचा ऑर्डर आल्याने चेतन यांनी कंपनीने प्रोव्हाईड केलेल्या मोबाईल क्र. ला फोन करून सपंर्क केला. त्यानुसार दिनांक ३१.०८.२०२४ रोजी ऑर्डर स्विकारण्याकरीता साद नावाचा व्यक्ती चंद्रपुरला एकोरी वार्ड येथील एका दवाखान्याजवळ आला. तिथे त्यांने डिलीव्हरी बॉय चेतन सोनवणे यास संपर्क केला आणि ऑर्डर स्विकारला. त्यानंतर सदरचा पार्सल कॅश ऑन डिलीव्हरी असल्याने डिलीव्हरी बॉय चेतन सोनवणे यांनी त्यास पेंमेंट बदल विचारणा केली असता, त्यांनी मी ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगीतले. साद नावाचा व्यक्तीने त्याला पेंमेंट करण्यासाठी फेक पेंमेंट अॅपचा वापर करून त्याला मोबाईलची किमंत २४,११६/- रू पाठविल्याचे फेक फोनपे पेमेंट गेटवेचा स्क्रिनशॉट दाखविला. ते पाहुन डिलीव्हरी बॉय यांनी पेमेंट आल्याचे गृहीत धरून तिथुन निघुन गेले.
वेळ निघत चालला २ ते ३ तास ओलांडल्यानंतर डिलीव्हरी बॉय यास लक्षात आले की मोबाईलच्या
मोबदल्यात केलेल्या पेंमेंट अद्याप पावेतो कंपनीच्या खात्यात आलाच नाही. मग त्यांनी वारंवार साद नावाच्या
व्यक्तीला फोन करणे सुरू केले. आणि साद त्यांना फेक स्क्रिनशॉट पाठवुन त्याची दिशाभुल करीत होता.
सगळी घटना घडल्यानंतर चेतन सोनवने यांनी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे धाव घेतली त्यावरून पोलीस
स्टेशन चंद्रपुर शहर येथे फसवुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हयाचा तपास पोनि. प्रभावती एकुरके यांचे मार्गदर्शनात पोस्टे चंद्रपुर शहर सायबर विभाग पोहवा/इमरान शेख आणि पोकों/सचिन राठोड यांनी सुरू केला. तपास हा तांत्रीक क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने त्याचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तांत्रीक विश्लेषणातुन गुन्हेगाराची संपुर्ण माहिती पोलीसांच्या हाती लागली. फसवणुक करणारा साद नावाचा व्यक्ती हा अहेरी जि. गडचिरोली येथे राहत असल्याची माहिती प्राप्त होताच तात्काळ पोस्टे चंद्रपुर शहर येथील सायबर विभाग इमरान शेख आणि सचिन राठोड यांचे सह सपोनि. मंगेश भोंगाडे यांना अहेरी जि. गडचिरोली येथे पोहचुन सदर ठिकाणी सापळा रचुन शिताफीने आरोपी साद यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी साद यास अटक करून गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, सदर आरोपी हा उच्चशिक्षीत तरूण असुन टेक्नीकल विभागातुन (बी.सी.ए.) पुर्ण केलेले आहे. शिक्षणाचा फायदा चांगल्या कामासाठी न करता त्यांनी लोकांसोबत सायबर फ्रॉड करण्याचा मार्ग निवडल्याने तो आज लोकांची फसवणुक करण्याचे काम करीत होता. तसेच त्यांने एक वर्षापुर्वी चंद्रपुर येथील एका नामांकीत मोबाईल शॉप येथुन मोबाईल घेवुन त्याला सुध्दा १८,०००/- रू चा फेक पेमेंट गेटवेचा स्क्रिनशॉट दाखवुन त्याची आर्थिक फसवुणक केली. आणि काही दिवसापुर्वी चंद्रपुर येथीलच एका नामांकीत ज्वेलर्स शॉप येथुन सोने खरेदी करून त्यांना सुध्दा ५७,०००/- रूचा फेक पेमेंटचा स्क्रिनशॉट पाठवुन त्यांची सुध्दा दिशाभुल करून आर्थिक
फसवणुक केल्याचे निष्पन्न झालेले आहे. यासोबतच सदर गुन्हयातील आरोपीने आणखी किती लोकांना सायबर फायनांशियल फॉडमध्ये गंडविले आहे याची सखोल चौकशी सुरू असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रभावती टी. एकुरके यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर सायबर विभाग इमरान शेख आणि सचिन राठोड हे करीत आहेत. =================================
तरी याद्वारे सर्व नागरीकांना/दुकानदार यांना आव्हाहन करण्यात येते की, आपल्या दुकानात कोणताही व्यक्ती खरेदी करण्यास आल्यास किंवा आपण कोणताही पेमेंट गेटवे नी ऑनलाईन पेमेंट केल्यास जोपर्यंत पेमेंट आपल्या खात्यात आल्याची खात्री होत नाही तो पर्यंत अज्ञात विश्वास ठेवु नये. शक्य असल्यास त्याचा संपर्क क्र. वा आधार कार्डची डिटेल्स घ्यावी. जेनेकरून फसवणुक झाल्याच त्याचा शोध घेण्यास पोलीसांना सहकार्य होईल. सर्तक रहावे सुरक्षित राहावे. “चंद्रपुर पोलीस सतत आपले सेवेत आपल्या साठी” =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे* संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*