गुन्हे शोध पथक पोस्टे रामनगरने मोटार सायकल चोरी करणारे अट्टल आरोपीचे ताब्यातुन पाच मोटार सायकल केल्या जप्त

0
10

=================================

गुन्हे शोध पथक पोस्टे रामनगरने मोटार सायकल चोरी करणारे अट्टल आरोपीचे ताब्यातुन पाच मोटार सायकल केल्या जप्त      

पोस्टे रामनगर येथील दाखल अपराध कमांक ९२१/२०२४ कलम ३०३(२) बि.एन.एस गुन्हयातील फिर्यादी निखील दिपक ठोंबरे, वय ३१ वर्ष रा. गजानन मंदीर वडगाव चंद्रपूर हयांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की दिनांक ३०/९/२०२४ रोजी चे रात्रो १०/०० वा. दरम्यान त्याचे स्वतःचे मालकीचे किराणा दुकानासमोर त्याची अॅक्टीवा मोपेड एम.एम.३४ ए.एन. ७१३० कि.अं. २०,००० रू ची ठेवली असता कोणतरी अज्ञात इसमाने चोरून नेली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपासादरम्यान गुन्हे शोध पथक रामनगर यांनी गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रीकदृष्टीने तपास करून आरोपी नामे चेतन विनोद आगडे, वय २२ वर्ष रा. जटपुरागेट रामनगर रोड चंद्रपूर याचे ताब्यातुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेली अॅक्टीवा मोपेड एम. एम.३४ ए.एन. ७१३० कि.अं. २०,००० रू चा माल जप्त केला तसेच त्याचेकडे गुन्हयासंबंधाने सखोल चौकशी केली असता त्याने आमचे पोस्टे ला दाखल असलेल्या अप क. २०८०/२०२४ कलम ३०३(२) वि.एन.एस, मधील चोरीस गेलीली काळया रंगाची स्प्लेंडर मो.सा. क. एम.एच. ३४ टि. ८७२ कि.अं. ४५०० रू तसचे अप क. ८६५/२०२४ कलम ३०३(२) बि.एन. एस मधील चोरीस गेलेली काळया रंगाची पेंशन प्लस प्रो मो.सा. एम.एच ३४ ए.एन. ४८७७ कि.अं. ३०,००० रू अशा नमुद आरोपीकडुन वरीलप्रमाणे तिन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या.

तसेच फिर्यादी नामे दर्शन पंकज जैन वय २३ वर्ष रा. राधीकासभागृहजवळ तुकुम चंद्रपूर हयांनी दिनांक १/१२/२०२४ रोजी यांनी त्याची युनीयन बँक समोर पार्कीग मध्ये त्याची पांढ-या रंगाची ज्युपीटर मोपेड क. एम.एच. ३३ सि.सी. ७४६१ कि.अं. ७०,००० रूची ठेवली असता कोणतरी अज्ञान चोराने चोरून नेली अशा रिपोर्ट वरून पोस्टे ला अप क. ११३४/२४ कलम ३०३(२) बि.एन. एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हे शोध पथक रामनगर यांनी गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रीकदृष्टीने तपास करून आरोपी नामे कपील प्रभु मेश्राम, वय ३३ वर्ष, रा. परीवर्तन चौक फुकटनगर चंद्रपूर याचे ताब्यातुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेली पांढ-या रंगाची ज्युपीटर मोपेड क. एम.एच. ३३ सि.सी. ७४६१ कि.अं. ७०,००० रूचा माल जप्त केला तसेच त्याचेकडे गुन्हयासंबंधाने सखोल चौकशी केली असता त्याने आमचे पोस्टे ला दाखल असलेल्या अप क. ११३४/२०२४ कलम ३०३ (२) बि.एन.एस, मधील चोरीस

सीएस कॅमस्कॅनर                                                            गेलीली काळ्या पांढ-या रंगाची ईलेक्ट्रीक मोपेड गाडी कि.अं. ६०,००० रू ची अशा नमुद आरोपीकडुन वरीलप्रमाणे दोन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या.

तरी वरीलप्रमाणे दोन आरोपीचे ताब्यातुन पोस्टे रामनगर गुन्हे शोध पथकाने एकुण ५ मोटार सायकली कि.अं. १,८४,५०० रू चा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / ११६५ आनंट लगत पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे पोहवा / २४३० लालु यादव, मपोहवा/४६२ नापोशि / २५०१ अमोल गिरडकर, पोशि८२५ हिरालाल गुप्ता, पोशि / ७८ डेंगळे, पोशि /६३० प्रफुल पुष्पलवार, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२ ठोंबरे, मपोशि / २६५३ ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.     ==============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here