==============================
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पारडी येथील अन्नातून विष बाधित मुलांची भेट*
_______________________________
आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पारडी येथील अन्नातून विष बाधित झालेल्या मुलांची भेट घेण्यात आली. मा.डॉ.सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार ही भेट घेण्यात आली असून, या मुलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी या मुलांवर आवश्यक ती उपचार प्रक्रिया सुरू केली आहे. डॉक्टरांनी त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती दिली असून, त्यांच्या आरोग्य सुधारासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. यावेळी मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक भानाची भावना आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन हे प्रेरणादायी ठरले आहे. प्रशासन आणि वैद्यकीय विभाग मिळून या परिस्थितीवर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
असे आश्वासन वैद्यकीय अधिकाऱ्यानी भाऊंच्या मार्गदर्शनात भेट देण्यात आलेल्या महायुतीच्या डॉ. मंगेश गुलवाडे, बंडू हजारे, नितीन भटारकर, प्रकाश देवतळे, जयप्रकाश कांबळे, छबूताई वैरागडे, किरण बुटले, मनोज पाल, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, उमेश आष्टणकर, राकेश बोमनवार, रामकुमार आकापल्लीवार यांच्या शिष्टमंडळाला दिली. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*