*चंद्रपर शहर पोलीस द्वारे चोरीला गेलेली होंडा एक्टिवा गाड़ी शोधून गाड़ी सोबत चोराला केले जेरबन्द*

0
5

==============================                        *चंद्रपूर*             =============================               

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे फिर्यादी श्री. 38 वार्षिक मंजुल सुनिल जैन , रा. पंचशिल चौक, झाडे हॉस्पीटलजवळ, चंद्रपूर यांनी दिनांक १५/१२/२०२४ रोजी तकार दिली की, फिर्यादी हे आपली एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी क. एम.एच. ३४ सि. के. ३२१० हि नेहमीप्रमाणे झाडे हॉस्पीटल ते पंचशिलकडे जाणाऱ्या रोडवर हॅन्डल लॉक करून ठेवली होती. सकाळी फिर्यादी हे बाहेर जाण्यास निघाले तेव्हा सदर गाडी हि दिसुन आली नाही. दि. १३/१२/२४ चे २३/०० वा. ते दि. १४/१२/२४ चे ०७/३० वा. दरम्यान एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी क. एम.एच. ३४ सि.के. ३२१० कि. १,००,०००/- रू. ची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले. फिर्यादीने दिलेल्या तकारीवरून गुन्हा नोंद करून तपासात सुरु केले असता गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. पोनि. प्रभावती एकुरके मॅडम यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मुखबीरच्या खबरेवरून शोध घेउन पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील पोउपनि. संदिप बच्छीरे तसेच डि.बी. कर्मचारी यांनी पो.स्टे. परिसरात आरोपी शोध कामी रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती मिळताच नमुद आरोपीस ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा कबुल केल्याने त्याचेकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचे नावः- १) शाकिर नबी शेख, वय २३ वर्षे, रा. बिनबा गेटजवळ, सिस्टर कॉलनी चंद्रपुर

जप्त माल :-
१) एक पांढऱ्या रंगाची एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी क. एम.एच. ३४ सि.के. ३२१०

अ.किं. १,००,०००/-रु

२) एक कथ्या रंगाची एक्टिवा कंपणीची मोपेड गाडी बिना नंबर प्लेटची जिचा इंजीन नं. JF50EU5625336, चेचीस नं. ME4JF507KHU625325 किं. ७०,०००/

असा एकुण १,७०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रभावती एकुरके मॅडम चंद्रपुर शहर, पो.उप.नि. संदिप बच्छीरे, कपुरचंद खरवार, सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईरशाद खान, रूपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली आहे. पुढील तपास म.पो.हवा. भावना रामटेके हे करित आहेत.    =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here