==============================
बल्लारपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर
येथील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनी करिता विद्यापीठ आणि वुमन्स डॉक्टर्स विंग आयएमए चंद्रपूर द्वारा आयोजित युथ फॉर डिजिटल लिटरेसी व सायबर सुरक्षा या विषयावर राष्ट्रीय शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय विसापूर येथे आयोजित कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली सायबर हायजिन प्रॅक्टिक्शनर मुजावर अली यांनी उपस्थित विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व ऑनलाईन सतर्कता आणि उपाययोजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जि. चंद्रपूर चे प्रभारी संचालक प्रा. डॉ. राजेश इंगोले सर, वुमन्स डॉक्टर्स विंग आयएमए चंद्रपूर चे उपाध्यक्ष डॉ. पुनम नगराळे, सचिव डॉ. समृद्धी आईचवार तसेच उमेश आडे, समाज सेवा अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपुर आणि विद्यापीठातील शिक्षिका आणि 70 विद्यार्थिनी उपस्थित होते. ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356