Home
Home गडचिरोली गडचिरोलीत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी : रुग्णांच्या सेवेत कोणतीही तडजोड खपवून...

गडचिरोलीत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी : रुग्णांच्या सेवेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही -मा.खा. डॉ. अशोक नेते.

0
130

===========================

                       गडचिरोली 

                     हॅलो चांदा न्युज

गडचिरोली,दिं. २९ एप्रिल — “रुग्ण सेवा हीच सर्वोच्च सेवा आहे आणि त्यात कोणतीही अडथळा वा गैरसोय खपवून घेतली जाणार नाही” अशा ठाम शब्दांत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाचा आढावा घेतला.रुग्णालयातील प्रमुख डॉ. प्रशांत पेंदाम यांच्यासह मा.खा. डॉ.अशोक नेते यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करत विविध वार्ड विभागांत प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा आणि सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली.रुग्णांची तब्येत सुधारण्यावर भर देत मा.खा. डॉ.अशोक नेते यांनी उपस्थित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूचित केले की, “रुग्णांच्या सेवेत तडजोड न करता, त्यांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवा.या रुग्णालयात एकूण १२ वॉर्ड असून सध्या १७२ रुग्ण भरती आहेत. डिलिव्हरी वॉर्ड, बालरोग वॉर्ड इत्यादींचा सविस्तर आढावा घेताना मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी सांगितले की, “प्रत्येक रुग्णास वेळेवर आणि दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.या भेटीदरम्यान महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. रेखाताई डोळस, विधी आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय चाटे, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या कुंदा मेश्राम यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी मा.खा. डॉ. अशोक नेते यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि रुग्णहिताच्या दिशेने कार्यरत असली पाहिजे. रुग्णांच्या सेवेत कोणतीही कमतरता खपवून घेतली जाणार नाही.   ====================   *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===================        *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here