Home
Home चंद्रपूर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निःशुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निःशुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी.

0
64

==========================

                          चंद्रपूर
                     हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) : – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर (जि.चंद्रपूर) येथे दोन ठिकाणी एकाच दिवशी निःशुल्क मोतिबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले.   श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटरच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरातील तपासणीमध्ये ज्यांना दृष्टीदोष आढळून आला त्यांच्यावर नागपूर येथे शालिनीताई मेघे हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.
राजकारणापेक्षा समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आ.मुनगंटीवार यांनी स्थान मिळविले आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबतच त्यांच्या आरोग्याचीही ते काळजी घेत असतात. त्याचदृष्टीने त्यांच्या पुढाकारातून दत्त मंदीर देवस्थान, नांदगाव (पोडे) ता. बल्लारपूर आणि जगन्नाथ बाबा मठ, ग्रामपंचायत समोर, हडस्ती, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. विसापूर येथील २५, तर नांदगांव पोडे येथील १२ रूग्‍णांवर नागपूरमध्ये मेघे हॉस्पिटलमध्ये निःशुल्क शस्त्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना चंद्रपूर येथून नागपूरला नेणे व परत आणून सोडणे, याची व्यवस्था रुग्णालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.
रुग्णांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. तपासणी, मार्गदर्शन व शस्त्रक्रिया निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ३५ हजारांच्यावर नागरिकांना मोफत चष्मे वितरीत करण्यात आले व १५ हजारांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, हे विशेष.    ================================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   
===============================

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here