रोजगार व उद्योग प्रशिक्षणासह महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न.

0
10

=============================

                            चंद्रपूर   

                      हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.):- यहोवा यिरे फाउंडेशन,रेल्वे यात्री एकता मजूर संघ,राष्ट्रीय उद्योग भारत, पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व उद्योग प्रशिक्षणासह महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार वितरण सोहळा

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे 24 मे 2025 रोजी
थाटात संपन्न झाला. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथेरोजगार व उद्योग या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण ही उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले. या अंतर्गत शिका,कमवा व प्रगती करा हा उपक्रम राबविण्यात आला होता.      या एक दिवसीय रोजगार व उद्योग प्रशिक्षण  हा कार्यक्रम चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार होता. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी डाॅ. रमेशकुमार बोरकुटे यांच्याशी कॉल च्या माध्यमातून संपर्क साधून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तसेच पुरस्कर्त्यांना भविष्यातील पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्याची माहिती मिळाली.

या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मराठी चित्रपटातील अभिनेत्री कु.मयुरी नव्हाते ( रांगडा मुवी फेम ) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व प्रशिक्षक म्हणून सुनिल कुमार मांडवे राष्ट्रीय उद्योग संघटन चे महामंत्री, दिल्ली,तसेच प्रशिक्षक श्रीमती गिरिजाताई उईके सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग नागपुर सह प्रशिक्षक शेषराव अजगरे सचिव राम सामाजिक शैक्षणिक संस्था लातुर,आदिवासी दलित मित्र व अध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समीतीचे डी.के.आरीकर, डाॅ. देव कन्नाके, नंदगोपाल पांडे, अध्यक्ष रेल यात्री एकता मजदूर संघ अकोला,सौ. अनुरीता ढोलकीया (ग्लोबल एक्सेलेंस मिसेस युनिव्हर्स महाराष्ट्र) , सौ.निता जोशी प्रशिक्षक महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र अमरावती, दत्ता बिझनेस कोच मुम्बई, राहुल जोगी ऑडिट ऑफिसर सहकार क्षेत्र चंद्रपूर जिल्हा, मस्के सहकार क्षेत्र, फेडरेशन चंद्रपूर, तुळसिराम जांभुळकर, अशोक पिसे,सौ. शिल्पाताई बनपूरकर, तांबे कु.अश्विनी पुरी,सौ.योगिता पाटेकर, डाॅ.नितु सिंग चव्हाण नागपूर, डाॅ.रिचा झांजरिया नागपूर, अलोक शर्मा फिल्म निर्माता नागपूर, अनिष चौरडीया फुलचंद भगत, ललित पांडे, रितेश नायर, डाॅ.युवराज ठाकरे, कु.एलिजा बोरकुटे अध्यक्ष यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर चंद्रपूर,अ‍ॅड.सौ. मनिषा शिंदे, सचिन पानघाटे, चेअरमन यहोवा यिरे अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह, रेव्ह.सुनिल कुमार चंद्रपूर, रेव्ह. विजय नळे प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी,सय्यद रमजान अली, अंनता गोखरे, दिपक शर्मा, हॅलो चांदा न्यूज चे मुख्य संपादक.. शशिकांत ठक्कर, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या रोजगार व उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमात ४०० हुन अधिक बेरोज़गार युवक युवतीना प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यक्रमात उद्योग क्षेत्र,पत्रकारिता क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे तसेच शासकीय, निमशासकीय, क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले.

मराठी चित्रपट व तेलगू चित्रपटात काम करणाऱ्या मुख्य नायिका (रांगडा मुवी फेम) कु. मयुरी नव्हाते व राष्ट्रीय उद्योग संघ दिल्ली महामंत्री, सह उपस्थित अन्य
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सि. ई.ओ. यहोवा यिरे फाउंडेशन तंथा राष्ट्रीय उद्योग भारत दिल्ली कोर कमिटी चे सदस्य व अनेक संस्थेत कार्यरत डाॅ रमेशकुमार यांनी या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन केले होते व त्यांच्या मार्गदर्शनात हे कार्यक्रम अतिशय थाटात संपन्न झाले.

बेरोज़गारी मिटली पाहिजे उद्योजक निर्माण झाले पाहिजे हाच डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांचा मुख्य उद्देश आहे.

डाॅ.रमेशकुमार बोरकुटे हे उद्योजक तयार करणे व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास २५०० हून अधिक युवक युवतीना रोजगार दिला असल्याची माहिती बोरकुटे यांनी दिली असून जवळपास त्यांनी ३५ हजार उद्योजक तयार केले असल्याची ही माहिती दिली.

डाॅ.रमेशकुमार यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची प्रमुख पाहुण्यांनी स्तुती केली व बोरकुटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत. पुरस्कर्त्यांना सुद्धा त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शिका, कमवा आणि प्रगती करा!हा संकल्प घेऊन डाॅ.रमेशकुमार वाटचाल करीत आहे, हे मात्र विशेष! 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here