◆ विविध कार्यक्रमांनी साजरा होणार जयंती उत्सव
◆श्रध्दा शौर्य यांची विशेष उपस्थिती.
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीय जयंती महोत्सवाचा समारोप येत्या शनिवार, 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजता येथील प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात होत आहे. या कार्यक्रमाला वीर रस कवयित्री श्रध्दा शौर्य प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांची मांदियाळी होती. त्याचा समारोपीय कार्यक्रम 31 मे रोजी असून, त्यातही बर्याच कार्यक्रमांची रेलचेल आहे. यावेळी कर्मयोगिनी अहल्यादेवी होळकर स्मरणिकेचे प्रकाशन, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, अहिल्यागाथा फोटो गॅलरीचे उद्घाटन, देशभक्तिपर सांस्कृतिक समूह नृत्य स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आदी कार्यक्रम यावेळी होणार आहे. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तुषार देवपुजारी, अॅड. रवींद्र भागवत हेही उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. मंगेश गुलवाडे असतील. नागपूरच्या वीर रस कवयित्री श्रद्धा शौर्य यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. श्रद्धा शौर्य यांनी केवळ तीन वर्षातच अवघी रंगभूमी गाजवली. इतक्या कमी कालावधीत त्यांचे समाजमाध्यमांवर 1.5 लाखांहून अधिक ‘फॉलोअर्स’ आहेत. त्यांच्या ‘श्रद्धाच्या चुडी’ या नाटकाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
या समारोपीय कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाच्या ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासन’चेही उद्घाटन होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव सुनील पोराटे संयोजक गजानन शेळके, पवन ढवळे, मयूर भोकरे, प्रवीण गिलबिले अपर्णा चिडे, रंजू मोडक, उपाध्यक्ष घनश्याम दरबार व रती संदीप पोशट्टीवार, कोषाध्यक्ष निलेश काळे, सहकोषाध्यक्ष यशवंत कन्नमवार, प्रसिध्दी प्रमुख संजय रामगिरवार व कपिश उजगांवकर आदींनी केले आहे
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356