पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे केवळ एक राज्यकर्त्या नव्हे, तर एक विचार, एक चळवळ, आणि स्त्री सक्षमीकरणाचं प्रतीक!

0
8

                            चंद्रपूर 

                      हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र ) :- पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि करुणेच्या बळावर एक आदर्श राज्य घडवलं. त्या काळातही त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचं संरक्षण, विधवा पुनर्विवाहास पाठिंबा, शिक्षण आणि स्वाभिमानाला वाचा फोडली. आजच्या प्रत्येक स्त्रीने गृहिणी असो, विद्यार्थिनी, शेतकरी, कामगार, वा उद्योजिका अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. स्त्री ही अबला नाही, ती सबला आहे हे जगाला दाखवून देणं हेच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल.

अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांचा विचार पुढे घेऊन जाऊया, तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेत समतेचं, सक्षमीकरणाचं आणि सशक्ततेचं समाजाचं स्वप्न साकार करूया…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

मोहम्मद इरफ़ान शेख
अध्यक्ष सामाजिक समता संघर्ष समिति चंद्रपुर

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here