वडसा
हॅलो चांदा न्युज
वडसा.(का प्र) :- जिल्हा गडचिरोली.कृषी पंपांसाठी डिमांड भरूनही अनेक शेतकऱ्यांना आजतागायत विद्युत मीटर प्राप्त झालेले नाहीत. सोलर पंपदेखील अनेकांना मिळालेले नसून, काही शेतकऱ्यांनी सोलर पंप नाकारत विद्युत मीटरसाठी डिमांड भरली असताना, त्यांना भरलेली रक्कम जीएसटी कपात करून परत केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी वडसा येते आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर शासन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यास तयार नसेल आणि त्यांची योग्य तोडगा काढत नसेल, तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल. विद्युत विभागासह संबंधित शासकीय कार्यालयांना घेराव घालण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे.”
या बैठकीस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कूरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते सह, काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356






















