Home
Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा काँग्रेसतर्फे आरमोरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संम्पन्न.

गडचिरोली जिल्हा काँग्रेसतर्फे आरमोरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संम्पन्न.

0
97

                        गडचिरोली

                   हॅलो चांदा न्युज

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता, संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि पक्ष बळकटीसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेस निरीक्षक सचिनजी नाईक तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत पुढील निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी संघटनेच्या मजबुतीसाठी प्रत्येक पातळीवरील कार्यकर्त्यांनी संघटीत आणि जिद्दीने काम करण्याचे निर्देश दिले.या बैठकीला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कोरची मनोज अग्रवाल,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा प्रशांत कोराम, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल भूपेश कोलते, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस वामनराव सावसाकडे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील सरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमालाताई पेदाम, माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी सभापती गिरधर तितराम, माजी उपसभापती नितीन राऊत, माजी नगराध्यक्ष आशाताई तुलावी, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस पंकज चहादे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. सध्याताई नैताम, सौ. आरती लहरी, सौ. भारती कोसरे, निलोफर शेख, हिरा मोटवानी, हकीमुदीन शेख यांचा समावेश होता.याशिवाय आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची धानोरा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, स्थानिक समस्या आणि संघटनेच्या कामकाजाबाबत मते मांडली. स्थानिक प्रश्नांवर संयुक्त कृती करून त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती दिशा ठरवण्यात आली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here