Home चंद्रपूर महाराट्रात चंद्रपूर येथून साथी अभियानाची सुरवात.
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(वि प्र ) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा) यांच्या अंतर्गत निराश्रीत बालकांना ओळख आणि प्रतिष्ठा आधार नोंदणी आणि बालकाचे कायदेशीर सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्याकडून महिला बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर व असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन प्रोजेक्ट हृदय संस्था यांच्या माध्यमातून शाळाबाह्य गरीब वस्तीत राहणाऱ्या बालकांना त्यांची दिग्निटी त्यांचे ओळख मिळवून देणे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी
सावित्रीबाई फुले प्राथ व उच्च प्राथ शाळा, अष्टभुजा वॉर्ड,चंद्रपूर येथे “साथी अभियान”या संस्थेअतर्गत शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड शिबीर घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. झेड. खान मॅडम, प्रभारी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर , दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर , प्रमुख पाहुणे. मीनाक्षी भस्मे मॅडम, महिला बाल विकास अधिकारी, चंद्रपूर, मोरेश्वर झोडे जिल्हा परिवेक्षा अधिकारी महिला बालकल्याण विभाग, अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर, मुख्याध्यापिका कु. भारती पाजणकर, शशिकांत मोकाशे, क्षेत्रीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे मत ए झेड खान मॅडम यांनी व्यक्त केले. निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण करण्याचे काम ” *साथी अभियान ” अंतर्गत सुरू आहे.यावेळी प्रकाश नगर, अष्टभुजा वॉर्डातील मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले. सदर साथी अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वस्त्यांमध्ये सामाजिक सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त बालकांची नोंदणी करण्यात आली. ज्यात बाबू पेठ इंदिरानगर नेहरूनगर प्रकाश नगर, आनंद नगर, अष्टभुजा वार्ड, भिवापूर माता नगर अहमदनगर दुर्गापुर तुकूम या प्रभागातील बालकांचा सर्वे करण्यात आला आज दिनांक 11 जुलै 2025 रोजी साथी अभियानाची महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी शाळेतील तक्रार पेटी मा. सहदिवाणी न्यायाधीश खान मॅडम व महिला बल विकास अधिकारी. भस्मे मॅडम यांच्या समक्ष उघडण्यात आली. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे मॅडम यांनीही बालकांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना शासन तुमच्या पाठीशी आहे व सदैव पाठीशी राहील तेवढेच सहकार्य तुम्हीही प्रशासनाला करावं व बालकांना शाळेत विशेष प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मोकाशे सर यांनी केले तर आभार मारोती दुर्गे यांनी मानले. यावेळी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी संध्या तोगर, सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा विधी प्राधिकरण, अजय पवार, पी एल व्ही, मारोती कोसे पी एल व्ही, विवेक चिमूरकर सहाय्यक,राणी मेश्राम, रश्मी भोयर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा प्रशासनाचा विशेष सहभाग लाभला याप्रसंगी सत्तर बालकांची उपस्थिती होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे 30 आधार कार्ड बनवण्यात यंत्रणा यशस्वी ठरली. या संपूर्ण कार्याचे साक्ष म्हणून बालकांचे पालक सुद्धा या कार्यक्रमाला अगत्याने उपस्थित होते. या कार्यक्रमातील माननीय न्यायाधीश व महिला बालविकास अधिकारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमचे भरभरून अभिनंदन केले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*