माना भ्रमण मंडळा तर्फे आम, किशोर जोरगेवार यांना निवेदन.
चंद्रपूर.(वि प्र) :- चंद्रपूर माना टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने हा परिसर निसर्गरम्य आहे. त्यामुळे या परिसरात शहरातील अनेक नागरीक भ्रमंतीसाठी येत आहेत. परंतू गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हा परिसर वनसदृस्य असल्याने येथे मोरांचेही वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. मात्र काही दिवसांपासून येथील मोरांच्या संख्येतही घट झालेली पाहावयास मिळत आहे. त्यांच्या संख्येत घट होत असल्याने त्यांची शिकार होत असल्याची शंका होत आहे. या वर आळा घालाण्याची मागीणी माना निसर्ग भ्रमण मंडळाचे अध्यक्ष अनुप चिवंडे.
माना टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात झोड-झुडपे असल्याने या परिसरातील निरामय वातावरण असल्याने परिसरातील मुख्सत्वे महानगरातील नागरीक मोठया प्रमाणात भ्रमंती व व्यायामासाठी येथे येत असतात. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असून याबाबत प्रशासनला वारवार निवेदन देऊन सुध्दा स्थानिक प्रशासन आणि वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे मोठया प्रमाणात वृक्षतोड होत राहिल्यास या परिसराची रया गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आहे. वृक्षतोड होत असल्याचे दिसल्यास कुणी त्यांना तसे करण्यास मज्जाव केल्यास सदर वृक्षतोड करणारी व्यक्ती हुज्जत घालतान नुकतेच आमच्या माना निसर्गभ्रमंती मंडळाच्या सदस्यावर ही मारहाण करण्याच्या उद्देशाने एक इसम धावूनही आला होता. तरी या अवैध वृक्षतोडी विरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आपणांस करीत आहोत.
आपणांस विंनती आहे की, आपण सदर गंभीर प्रकरणी लक्ष देवून वन विभागास योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत तसेच पोलीस प्रशानासही या परिसरात गश्त घालण्याची सुचना करावी जेणे करुन अवैध वृक्षतोड व मोरांची शिकार होण्यास आळा बसेल व या परिसरातील नैसर्गिक स्थिती कायम राहिल. या वेळी शिष्ठ मडंळात अनुप चिवंडे, विजय चहारे, प्रमोद आबंटकर, कालीदास वाटगुरे, अशोक तपासे, अतुल देशकर, किशोर आंकोजवार, राजु शास्त्रकार, नितिन बाटवे, नरेंद्र आडे, विद्याधर चौधरी, प्रकाश आत्राम, आदी माना भ्रमण मडंळाचे सदस्य उपस्थिती होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*