Home
Home चंद्रपूर काँग्रेसचे शहराच्या समस्या बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.!

काँग्रेसचे शहराच्या समस्या बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.!

0
59

                          वरोरा

                   हॅलो चांदा न्युज

वरोरा.(वि प्र) :-  शहरातील मुख्य रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व इतर अनेक समस्यांबाबत वरोरा शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
शहरातील अनेक मुख्य रस्ते खड्डेमय झाले असुन सदर रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.रस्त्यावरील वाढते अतिक्रमण, मोकाट जनावरे, घंट्यागाड्या, वाढीव पाणीपुरवठा योजना, आनंदवन चौक व डॉ. कलाम (रत्नमाला) चौकात वाहतूक सिग्नलचे अर्धवट काम,नालेसफाई याशिवाय इतर अनेक मागण्यांबाबत मुख्याधिकारी विशाखा शेळकी
यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. दहा दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
याप्रसंगी वरोरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, माजी नगरसेवक राजेश महाजन, छोटू भाई शेख ,अनिल झोटिंग, मनोहर स्वामी, निलेश भालेराव ,प्रमोद काळे ,शुभम चिमुरकर, सनी गुप्ता, सलीम पटेल, अमर गोंडाणे, मनीष जयस्वाल, बाळू चिंचोलकर ,सुभाष दांदले,राहिल पटेल, राजेंद्र बनसोड, अमोल सेलकर , युवराज मोरे, अय्युब पठाण, शिरोमणी स्वामी ,मंगला पिंपळकर,योगेश खोब्रागडे,किशोर पारधी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here