Home चंद्रपूर वर्ध्यात युवा उद्योजकतेला चालना! शेकडो युवकांना मार्गदर्शन देणारा रोजगार प्रशिक्षण मेळावा यशस्वी.
वर्धा
हॅलो चांदा न्युज
वर्धा.(वि प्र) :-शेकडो युवक-युवतींना रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करणारा एक दिवसीय रोजगार व उद्योग प्रोत्साहन प्रशिक्षण मेळावा वर्धेतील शांती भवन येथे उत्साहात पार पडला. यहोवा यिरे फाऊंडेशन, महाराष्ट्र उद्योगजक विकास केंद्र वर्धा आणि राष्ट्रीय उद्योग संघटन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला वर्धा जिल्ह्यातून २०० पेक्षा अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. सहभागी तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण, आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणाऱ्या मानसिकतेबाबत सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय उद्योग संघटनाचे महामंत्री सुनीलकुमार मांडवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका व समुपदेशक डॉ. रत्ना चौधरी नगरे होत्या. त्यांनी युवकांमध्ये आत्मनिर्भरतेची जाणीव जागवण्याचे महत्त्व अधोरेखित करत भविष्याचा विचार करून कौशल्यविकासाची दिशा दाखवली.
उद्योग मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र उद्योगजक विकास केंद्र वर्धाचे परीक्षक अनुराग वांदीले, तसेच धनश्री आणि नीलम यांनी सहभागी तरुणांना व्यवसायवृद्धी, मार्केटिंग, आर्थिक नियोजन तसेच शासकीय योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुञसंचालन अश्विनी पुरी यांनी केले. यहोवा यिरे फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी “शिका, कमवा आणि प्रगती करा” या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन सत्रात आपली यशोगाथा मांडली. त्यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत अनेक तरुणांना व्यवसायाच्या दिशेने प्रवृत्त केल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पुढील रोजगार व उद्योग प्रशिक्षण मेळाव्याची घोषणा करण्यात आली. येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी हा भव्य मेळावा अमरावती येथे होणार असून, इच्छुकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा एलिजा बोरकुटे, वर्धा जिल्हा समन्वयक मयूर फटीग आणि त्यांच्या टीमने काटेकोर नियोजनाने केले. संपूर्ण मेळावा अत्यंत शिस्तबद्ध, सुस्थितीत आणि परिणामकारक ठरला.
रोजगार व स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल युवकांना प्रेरणा देणारे ठरले असून, यापुढील काळात अधिकाधिक युवकांना सक्षम बनवण्यासाठी सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*