Home
Home चंद्रपूर ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने दिले खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन.

ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने दिले खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन.

0
123
                      चंद्रपूर
                हॅलो चांदा न्यूस

चंद्रपुर(विशेष प्रतिनिधी):चंद्रपुर – वणी – आरणी
लोकसभा क्षेत्र चे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ऑल इंडिया जमीयतुल कुरेश ने त्यांच्या वरोरा निवासस्थानी भेट घेऊन कुरेशी समाजाला व्यापार क्षेत्रात येत असलेल्या समस्यांबाबत चे निवेदन दिले.

कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत कायदेशीर अडथळे व अन्याय थांबविण्यासाठी शासनस्तरीय त्वरित निर्णय घेण्यासाठी
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून सकारात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील याप्रसंगी केली.ऑल इंडिया जमीयतुल कुरेश चे अब्दुल रज्जाक कुरेशी, सय्यद रमजान अली, करीम कुरेशी अब्दुल नबी कुरेशी, अज्जू कुरेशी, मुंतजिर कुरेशी, शहजाद कुरेशी, अन्सार कुरेशी, जमील कुरेशी,शहानुर कुरेशी, जाकीर कुरेशी,जावेद कुरेशी सह फार मोठ्या संख्येत कुरेशी बांधव उपस्थित होते.जमीयतुल कुरेश ने आपल्या निवेदनात सांगितले कि महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक व कायदेशीररित्या पशू व्यापार, वाहतूक व कत्ल व्यवसायात आहे. मात्र अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार, बेकायदेशीर एफ.आय.आर., गोरक्षण केंद्रातुन जनावरे विक्री व चोरी होणे, पोलिस/गोरक्षक कारवाया, व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे समाजावर आर्थिक, सामाजिक, कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे तसेच समाजाच्या अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक सामाजिक, मानसिक, त्रस्त समाजाने या बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुकारला आहे, त्यामुळे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाले आहे. मास एक्स्पोर्ट च्या कंपन्या बंद पडत आहे याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायापासून आपला भारत देश जगात सरावात जास्त बीफ एक्स्पोर्ट करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे परंतु सदरहू समाजावर आजही अन्याय सुरूच असून रास्त व कायदेशीर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा समाज खरीदी विक्री करणार नाही सदरहू कंपन्यांना माल देणार नाही.असे निर्णय घेण्यात आले असल्याचे देखील या प्रसंगी सांगण्यात आले

कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने 10 मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहे, हे मात्र विशेष!

१. आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्यासाठी APMC (कृषी उत्पन्न बाजार समित्या) ऑनलाइन प्रणालीचे अनिवार्याकरण. तसेच अ डिजिटल पेमेंट पॉर्टल, ऑनलाईन बाजार वेगण, स्लिप/पावतीचे संगणकीकरण आणि राज्यभर एकसमान सेस शुल्क व व्यापारी लाइसन्सची वेळेत वितरण करण्याच्या मागणीसह एकूण 10 मागण्या केल्या आहे.

सदरहू व्यवसाय हा देशाला जागतिक स्थरावर मान मिळून देणारा व्यवसाय असून देशाला आर्थिक दृष्ट्या जागतिक स्थरावर मोठा करणारा व्यवसाय असून या व्यवसायला महत्व व सुख सुविधे साठी या व्यापार्यांना लोन, परवाने, प्रशिक्षण, वाहतूक, परतफेड याबाबत एकाच कार्यालयातून त्वरित निर्णय व्हावे अशी देखील मागणी केली असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कुरेशी समाजाच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य करत या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येईल व आपणास न्याय मिळावा या करिता मी विशेष प्रयत्न करणार अशी हमी दिल्याने कुरेशी समाजाने देखील त्यांचे आभार व्यक्त केले!

वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्याशिवाय कुरेशी बिरादरी सुरक्षित होऊ शकणार नाही असे देखील या प्रसंगी सांगण्यात आले, हे मात्र विशेष!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर “व्यापार बंद व संविधानिक आंदोलन” सुरूच आहे.पुढे पुढे पाहू होणार तरी काय कुरेशी समाजाला केव्हा मिळणार न्याय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here