Home
Home चंद्रपूर मिलिंद साळवे, Anflora हायजिन को फाउंडर मालेगाव नाशिक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि...

मिलिंद साळवे, Anflora हायजिन को फाउंडर मालेगाव नाशिक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि उद्योजकीय मार्गदर्शन सोहळा थाटात संपन्न….

0
144

 

     HELLO CHANDA NEWS

 

चंद्रपूर(का. प्र.): सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, येथील अर्थशास्त्र विभागाकडून पी.एम. उषा स्कीम अंतर्गत जी. एस. सी. RUSA याद्वारे तज्ज्ञांचे विचार, ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावे,याकरिता “Certificate course on start up India scheme”, या विषयावर वर आयोजन करण्यात आले. मिलिंद साळवे के ई एम एस सर्विसेस सीईओ,मालेगाव, नाशिक . त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाद्वारे रोजगार देऊ केला तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप करिता भांडवल पाहिजे ते सुद्धा देण्याची तयारी दर्शविली त्यांचे क्लिनिंग बाबतचे स्वच्छतेबाबतचे अनेक उत्पादने त्यांनी कशी बनवली कशा पद्धतीने बनवावी त्याचे पॅकेजिंग कसे करावे विक्री कशी करावी जाहिरात कशी असावी कमीत कमी पैशात जास्तीत जास्त उत्पादने आणि अधिकाधिक नफा कसा मेळावा या सर्व बाबतीत विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट बनवून घेतले कसा प्रोजेक्ट बनवावा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सर्व उत्पादनांपैकी एक एक वस्तू महाविद्यालयाला गिफ्ट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली नंदुरकर मॅडम आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. तुषार आवळे सर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. प्रेक्षणा बागेसर, प्रा.आकाश वाळके तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here