Home चंद्रपूर बांबू लेडी सौ. मीनाक्षी वाळके यांच्याद्वारे तरुण मंथनाला बळकट करणारे प्रेरणादायी सत्र...
HELLO CHANDA NEWD
चंद्रपूर(का. प्र.): सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, येथील अर्थशास्त्र विभागाकडून पी.एम. उषा स्कीम अंतर्गत जी. एस. सी. RUSA याद्वारे तज्ज्ञांचे विचार, ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावे,याकरिता “Certificate course on start up India scheme”, या विषयावर दिनांक पाच ऑगस्ट 2025 रोजी आयोजन करण्यात आले.
ज्यामध्ये भारतातील बांबू लेडी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो,त्या सौ. मीनाक्षी वाळके यांनी मार्गदर्शन केले. उद्योजकीय चमत्काराने त्यांच्या टिकाऊ बांबू उत्पादनामुळे जसे की हस्तकला, बांबूचे दागिने, घरगुती सजावटीच्या वस्तू याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर भरपूर चर्चा केली. त्यांचा हा उद्योजकीय प्रवास वैयक्तिक हानी नंतर सुरू झाला आणि त्यातून त्यांना बांबू हस्तकला विषयीचा आपला उत्साह शोधण्याकरिता प्रवृत्त केले. चंद्रपूर मधील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपले जीवन बदलविले आणि आपल्या सारख्याच अनेक महिलांचे सक्षमीकरण केले. अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. आज त्यांची उत्पादने जागतिक पातळीवर मागणीसाठी प्रभावित करीत आहेत. ज्यामध्ये स्वित्झर्लंड, लंडन, फ्रान्स आणि स्वीडन मध्ये सुद्धा ग्राहक आहेत.
त्यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन करून उद्योग करण्याकरिता, रोजगार मिळविण्याकरिता प्रयत्नशील असावे याबाबत प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरयू पोतनुरवार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर सर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली नंदुरकर मॅडम आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. तुषार आवळे सर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. प्रेक्षणा बागेसर, प्रा.आकाश वाळके तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त
उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*