Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील उत्कृष्ट पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ.अशोक उइके यांच्या...

चंद्रपूर जिल्हयातील उत्कृष्ट पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ.अशोक उइके यांच्या हस्ते सत्कार!

0
123

HELLO CHANDA NEWS

चंद्रपूर(वि.प्र.): दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात यावर्षी सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचे शुभहस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले आहे.

१)विनोद गजानन भुरले, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील पोलीस ठाणे गडचांदूर, मुल, घुग्घुस, गोंडपिपरी परिसरात अवैध जनावर तस्करी/वाहतुक विरुध्द कार्यवाही क३न एकुण २७८ गोवंश जनावरांची सुटका करुन एकुण ३,७५,१००/- रुपयाचा माल जप्त केले आहे. तसेच जिल्हयातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या चोरी व घरफोडीचे एकुण ३१ गुन्हे उघडकीस आणुन त्यातील गुन्हेगारांना अटक करुन आरोपींकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ८८,६९,९००/- रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने हस्तगत करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.   

२)संतोष ज्ञानेश्वर निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस ठाणे ह‌द्दीतून घरुन निघुन गेलेल्या, पळुन गेलेल्या, हरवलेल्या आणि पळवलेल्या एकुण ८५० मुलं/मुली, महिला व पुरुष यांचा शोध घेवुन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देवुन करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

३)किशोर रतन वाकाटे, पोलीस अंमलदार/१२३९, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळया ठिकाणी बनावटी देशी दारु वाहतुक करणाऱ्यां लोकांची गोपनिय माहिती काढुन एकुण ३ आयशर ट्रक मधील बनावट दारुच्या एकुण ९३५ पेट्या किंमत ६२,७२,५००/- रु.चा मुद्देमाल जप्त करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली भरीव व उत्कृष्ट कामगिरी चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात केलेली आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here