Home
Home चंद्रपूर काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या मोर्चामध्ये माननीय पंतप्रधानांबद्दल काढलेल्या अप शब्दांचा निषेध आहे...

काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या मोर्चामध्ये माननीय पंतप्रधानांबद्दल काढलेल्या अप शब्दांचा निषेध आहे _भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा.

0
132

अपशब्द काढणाऱ्यांवर कडक कारवाई करा

चंद्रपूर.(का. प्र.) 14 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपुरात काँग्रेस व त्याच्या सहयोगी पक्षांनी मोर्चा काढला होता. सरकार व निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा होता. देशातील प्रत्येकाला सरकार विरोधात बोलण्याचा व शांततामय निदर्शने करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसारच हा मोर्चा काढण्यात आलेला असावा.

परंतु या मोर्चात उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी भारताचे पंतप्रधान देश गौरव नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध अपशब्द काढले. जे अतिशय निंदनीय आहे. देशाच्या पंतप्रधानांबद्दल काढलेल्या या अप शब्दांचा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे भाजपच्या एका शिष्टमंडळाद्वारा एक रीतसर तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी ही तक्रार स्वीकारून यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, राहुल पावडे,डॉक्टर मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, रामपाल सिंग, किरण बुटले, नम्रता  ठेमस्कर , श्रीनिवास जंगम, विशाल निंबाळकर, सचिन कोतपल्लीवार, पुरुषोत्तम सहारे, चांद सय्यद, गौतम निमगडे, काशिनाथ सिंह, समीर केणे, हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, शांताराम चौखे, सरस्वती दास, मीनाक्षी उपगंलावार , मोनीश् आस्वानी, भोजराज शिंदे, दीपक मडावी, अरविंद बोरकर, गोणी जसपाल इंदर सिंग, आकाश खत्री उपस्थित होते

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here