Home
Home चंद्रपूर बहिणींनकडून संकलित केलेल्या तब्बल २८ हजार राख्यां मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहोचविला जनतेचा विश्वास...

बहिणींनकडून संकलित केलेल्या तब्बल २८ हजार राख्यां मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहोचविला जनतेचा विश्वास आणि प्रेम..

0
100

 

 HELLO CHANDA NEWSE

चंद्रपूर.(का. प्र.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रक्षाबंधनानिमित्त भगिनींनी पाठवलेल्या राख्यांच्या संकलनाचा भव्य उपक्रम महाराष्ट्रभर उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रपूर महानगर भारतीय जनता पक्षाने तब्बल २८,२१२ राख्यांचे संकलन करून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या.

या सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाष कासनगोटटूवार, महामंत्री रवी गुरनुले. सविताताई दंडारे, माजी महामंत्री नामदेव डाहूले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, मंडळ अध्यक्ष. सुभाष अदमने. विमल काटकर, मुग्धा खांडे, कल्पनाताई बागुलकर, मंडळ अध्यक्ष सरिकाताई संदुरकर, विनाश उत्तारवार , जयकुमार सिंह, राकेश बोमनवार, अक्षय घोटेकर, चंद्रशेखर शेट्टी, नकुल वसामवार, संजय सिंह, राजू शस्त्रकार, राजकुमार आकापल्लिवार, सीमा मडावी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या माझ्या बहिणींनी देवा भाऊंवर केलेल्या विश्वास व प्रेमाची दखल जरूर मी घेणार आणि आपला ऋणी राहील असे सांगितले.

जिल्हाध्यक्ष इंजी. सुभाष कासनगोटटूवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राखी संकलन हा उपक्रम केवळ एक सोपस्कार नसून समाजातील आत्मीयता, विश्वास आणि बंधुभावाचे जिवंत प्रतीक आहे. भगिनींनी दाखवलेले प्रेम आणि निष्ठा या राख्यांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचले असून, जनतेशी असलेल्या आत्मीय नात्याचा हा एक सुंदर प्रत्यय आहे.

कार्यकर्त्यांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीतील संघटितपणाचे आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक असल्याचे स्पष्ट केले. रक्षाबंधनाच्या या निमित्ताने बांधली गेलेली राखी ही केवळ परंपरेचे प्रतीक नसून विश्वास, निष्ठा आणि भावनिक बंधाची साक्ष असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here