Home चंद्रपूर अक्षता मोगरे (हजबन ) जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा चंद्रपूर तसेच गोविंद मैना फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे आयोजित आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याधपिका या कार्यक्रमात माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे तसेच शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते आदर्श मुख्याधपिका म्हणून अक्षता मोगरे (हजबन) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा हा सत्कार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुरस्कार देऊन करण्यात आला.
अक्षता मोगरे (हजबन ) ह्या मागील 12 वर्षापासून चंद्रपूरच्या पठाणपुरा येथील चिल्ड्रन्स अकॅडमी इंग्लिश मिडीयम शाळेच्या मुख्याधपिका या पदावर कार्यरत आहे.
अक्षता मोगरे यांनी विद्यार्थ्याच्या शिक्षणात विविध उपक्रम राबविलेत व शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या करिता त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये ही राज्य स्तरावर यश प्राप्त केले आहे.
मागील 12 वर्षापासून इयत्ता दहावीचा निकाल 100% लागतो.अक्षता मोगरे यांनी शाळेत विविध उपक्रम सुरू केले,जसे आबाकस, मेमरी क्लास, एज्युफन, हस्तलेखन, रोबोटिक्स, व असे अनेक अभ्यासक्रमाला महत्व देत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, हे मात्र विशेष!
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*