Home
Home चंद्रपूर नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरात जाण्यासाठी अपुरे राहिलेले पुलाचे काम पूर्ण करावे...

नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरात जाण्यासाठी अपुरे राहिलेले पुलाचे काम पूर्ण करावे या बाबत तहसीलदारांना दिले निवेदन !

0
96

 HELLO CHANDA NEWS

भद्रावती(वि. प्र.):भद्रावती तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर या परिसरात सुमारे ४० ते ५० घरांची लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना नदी पार करावी लागते. या करिता चांदा ते बांदा योजनेअंतर्गत २०१८ साली पुल बांधकामाचे काम सुरू झाले होते. परंतु भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकून ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे तेथील नागरिकांची समस्या जैसे थे राहिली असून आज पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
              पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांना शाळा व महाविद्यालयात जाण्यास, तर गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास प्रचंड अडचणी येतात. स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

                      लवकरात लवकर नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरात जाण्यासाठी अपुरे राहिलेले पुलाचे काम पूर्ण करून देण्याबाबत चे निवेदन भद्रावतीचे तहसीलदार यांना भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसैनिक सुरज शाहा यांनी दिले आहे
.
                त्यांनी दिलेल्या या निवेदनात अशी मागणी केली आहे की 1. चांदा ते बांदा योजनेतील अपुरे राहिलेले पुलाचे काम का पूर्ण झाले नाही? याची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व तात्काळ प्राधान्याने अपुरे राहिलेले पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे.
              एवढेच नव्हे तर दिलेल्या निवेदनाप्रमाणे ७ दिवसांच्या आत कारवाई करून काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत. अन्यथा शिवसेनेच्या वतीने समस्त पीडित नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देखील निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे, हे मात्र विशेष!
     

                   या निवेदनाची प्रतिलिपी अनेक लोक प्रतिनिधी सह चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. 

                हे निवेदन शिवसैनिक सुरज शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा शिवसैनिक निलेश उरकुळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार भद्रावती यांना देण्यात आले.

              यावेळी उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, चंदू मडावी, रवींद्र वाटेकर, संदीप नागपुरे, कादर खान पठाण, रेखा ताजने, संगीता शिवरकर, सह अनेक नंदोरीवासी उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here