HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने गुरुवारी 18 सप्टेंबर 25 रोजी बंद राहणार!
चंद्रपूर(का.प्र.):
इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखा व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स तर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व दवाखाने दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी बंद ठेवण्यात येणार अशी माहिती एका पत्रकान्वये मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने दिनांक 05/09/2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाम मत असल्याने यावर त्यांनी खालील मुद्द्यांवर आक्षेप नोंदवत सांगितले त्यात प्रमुखतः
१.शैक्षणिक असमानता :
MBBS हा 5.5 वर्षांचा सखोल अभ्यासक्रम आहे, तर CCMP फक्त 1 वर्षाचा. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड होणार.
२. रुग्ण सुरक्षिततेवर धोका:
अपूर्ण प्रशिक्षणामुळे चुकीचे निदान व उपचार होऊ शकतात.
३. दुहेरी प्रणालीचा धोका:
MMC ही फक्त MBBS डॉक्टरांसाठी आहे. CCMP डॉक्टरांना परवानगी दिल्यास गोंधळ वाढेल.
४. कायदेशीर बाबी:
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार आधुनिक औषधोपचारासाठी फक्त MBBS डॉक्टर पात्र आहेत.
५. आंतरराष्ट्रीय दर्जा कमी होण्याची भीती:
CCMP मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय व्यवस्थेचा मानक दर्जा कमी होईल.
६. भविष्यातील दुष्परिणाम:
या निर्णयामुळे इतर पर्यायी पद्धतीच्या डॉक्टरांकडूनही अशा मागण्या वाढतील.
उपरोक्त विषयांवर गांभीर्याने विचार करावा व CCMP डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ MBBS डॉक्टरांनाच आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा व 05/09/2025 चे परिपत्रक त्वरित मागे घेण्यात यावे. या करिता दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यभर 24 तासांचा लाक्षणिक संप करण्यात येणार असून सर्व आरोग्यसेवा बंद ठेवण्यात येतील,
असे आवाहन डॉ. मंगेश गुलवाडे
उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य (2013-14)
डॉ संजय घाटे
उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य
डॉ. रितेश दीक्षित अध्यक्ष, डॉ. सुश्रुत भुकते सचिव,
डॉ. राहुल सैनानी खजिनदार,
इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर सह डॉ. फुरहान अहमद अध्यक्ष,
डॉ. नम्रता यादव उपाध्यक्ष, डॉ. देवाशिष घुगे उपाध्यक्ष, डॉ. संजय रिनायत सचिव,
डॉ. अश्विनी तुंबडे सचिव, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांनी केले आहे.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*