Home
Home चंद्रपूर तहसीलदारांनी मान्य केल्या ग्रामवासीयांच्या मागण्या!..भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक!

तहसीलदारांनी मान्य केल्या ग्रामवासीयांच्या मागण्या!..भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक!

0
105

 HELLO CHANDA NEWS

               भद्रावती(ता.प्र.): नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालयपर्यंत आयोजित भव्य पायदळ आंदोलन शिवसेनेच्या वतीने व समस्त नंदोरी वासियांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडले असून.

                  या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे.
पायदळ यात्रेच्या माध्यमातून नंदोरी ग्रामवासीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला! असे म्हणता येईल.

                  या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, युवक सहभागी झाले. विशेष म्हणजे या समस्येमुळे रोज त्रस्त होणारी शाळकरी मुले व मुली देखील आंदोलनात सहभागी झाली. यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाले.

                  तहसील कार्यालयात धडक देताच सर्वप्रथम मागील वर्षी पुलाच्या अभावामुळे वाहून गेलेले स्वर्गीय श्री. कवडुजी येटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

                     यानंतर तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांसमोर ग्रामवासीयांच्या मागण्या मान्य करीत
संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती एका पत्रकान्वये मिळाली असून
२०१८ पासून प्रलंबित असलेले पुलाचे अपुरे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच तोपर्यंत नागरिकांना होणाऱ्या हालअपेष्टा लक्षात घेऊन तातडीने सध्या पुरता येण्या-जाण्याकरिता सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात. असे सांगण्यात आले.

                शिवसेनेचे सुरज शाहा यांनी सांगितले की जर १५ दिवसांच्या आत या विषयावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून काम सुरू झाले नाही, तर या नंतरचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. हा लढा उग्र झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.असा इशाराच प्रशासनाला दिला.

                   या आंदोलनाचे नेतृत्व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले व शिवसेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे ही प्रामुख्याने हजर होते.

           या आंदोलनावेळी नंदोरी गावाचे सरपंच मंगेश भोयर, युवा शिवसैनिक निलेश उरकुडे , शिवसैनिक भूषण जाधव, शिवसैनिक चंदू मडावी, युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, युवा शिवसैनिक राज चव्हाण, प्रशांत रामटेके, अमोल लेडांगे, रवींद्र वाटेकर, शंकर ठेंगणे, महेश उरकुडे, प्रज्वल एकरे सह गाववासी, महिला वर्ग, शेतकरी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

             या यशस्वी आंदोलनामुळे नंदोरी ग्रामवासीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह व ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे, हे मात्र विशेष!

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here