Home
Home चंद्रपूर ख-या अर्थाने देशाला स्वातंत्र्य १७ सप्टेंबर लाच मिळाले.

ख-या अर्थाने देशाला स्वातंत्र्य १७ सप्टेंबर लाच मिळाले.

0
108

जेष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांचे प्रतिपादन.

HELLO CHANDA NEWS

               राजुरा(ता.प्र.):भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले असले तरी हैद्राबाद स्टेट ची जुलुमी सत्ता सरदार पटेल यांच्या करारी बाण्याने व स्वामी रामानंद यांच्या लोकलढ्यामुळे संपुष्टात येऊन १७ सप्टेंबर १९४८ ला ख-या अर्थाने भारत देश स्वतंत्र झाला. निजामशाही ही अन्यायी राजवट असल्याने त्याविरुद्ध सर्व धर्मीय अंशी टक्के लोक होते.

                  हा लढा धार्मिक नव्हता तर अन्यायाविरोधात लढला गेलेला हा संघर्ष होता. म्हणूनच देशाला सर्वच दृष्टीने ऐतिहासिक ठरलेला हा मुक्तिसंग्राम सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला असल्याचे प्रतिपादन पुणे येथील जेष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी केले.

                   राजुरा येथील सम्राट सिलेब्रेशन सभागृह येथे आयोजित राजुरा मुक्तिसंंग्राम दिन सोहळ्यात उद्घाटन करतांना भालेराव बोलत होते.

           या सोहळ्याचे अध्यक्षस्थान पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ.शरद निंबाळकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश लांजेकर, माजी जि.प.सदस्य अविनाश जाधव, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, ज्येष्ठ व्यापारी संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, प्राचार्य दौलत भोंगळे, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशपांडे, डाॅ.उमाकांत धोटे, डॉ. विशाल मालेकर, दिलीप सदावर्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

                या सोहळ्यात राजुरा क्षेत्रातील पहिले सर्जन डॉ. रुपेश कवडू सोनडवले, संशोधक व कोचिंग विद्यापीठाचे सदस्य डॉ. विशाल सुधाकर बोनगीरवार, ब्रिटिश सरकारची शेवेनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकील ॲड.दीपक यादव चटप, क्षेत्रातील पहिली उच्चविभूषित सर्जन डॉ. वर्षा दशरथ कुळमेथे – पंधरे, क्षेत्रातील नाभिक समाजातील पहिले डॉक्टर डाॅ. संकेत दिलीप शेंडे, क्षेत्रातील सिंधी समाजातील पहिला चार्टर्ड अकाउंटंट रोशन प्रकाश हावडा आणि क्लिपलिफ या दुबईस्थित आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक शोएब अजित शेख या सर्वांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ व साडी देऊन परिवारासह सत्कार करण्यात आला.

                यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलतांना डाॅ. शरद निंबाळकर म्हणाले की, देशातील शेतक-यांची स्थिती गंभीर असून विदर्भातील शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात होणा-या आत्महत्या या सरकारी धोरणाचे पितळ उघडे पाडणारी बाब आहे. या आत्महत्यांमुळे राजकारणी तर सोडा पण समाजमन उद्विग्न का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे व ॲड. वामनराव चटप यांची भाषणे झाली. डाॅ.विशाल बोनगिरवार व ॲड. दिपक चटप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मानपत्राचे वाचन प्रा. डाॅ. विशाल मालेकर,१७ प्रा.डाॅ हेमचंद दुधगवळी, केशवराव ठाकरे, भिमय्या बोर्डेवार, करूणा गावंडे, सुषमा शुक्ला, प्रिया खंडाळे यांनी केले.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिदिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ, संचालन प्रा.डाॅ. अर्चना जुनघरे व ॲड. गायत्री उरकुडे यांनी केले. आभार सहसंयोजक मिलींद देशकर यांनी मानले. स्वागतगीत व देशभक्तीपर गीत अल्का सदावर्ते आणि आरोही संगीत विद्यालयाच्या चमूने सादर केले.

                     सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक मिलींद गड्डमवार, प्रा.डाॅ.जगदीश शिंदे, गणेश बेले, कैलाश उराडे,वामन पुरटकर, रंगराव कुळसंगे, स्वतंत्रकुमार शुक्ला, संदीप कोंडेकर, प्रा. कविता कवठे, सुनिता कुंभारे, लता कुळमेथे, प्रा.सुनिता जमदाडे, प्रतिभा भावे, ज्योती कोरडे, रचना देवगडे यांचेसह मुक्तिदिन उत्सव समिती व स्वरप्रिती कला अकादमीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here