Home चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयात वन्य जीव सप्ताहाचे आयोजन!
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का. प्र.): प्राणीशास्त्र विभाग सरदार पटेल महाविद्यालय आणि इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पोस्टर आणि छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन तसेच व्याख्यानाचे आयोजन 09 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी.एम. काटकर सर होते तसेच उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून विभागीय वन अधिकारी बापू येडे उपस्थित होते. इको-प्रो सामाजीक संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे हे देखील प्रमुख अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित होते. तसेच विभागप्रमुख डॉ राजलक्ष्मी कुळकर्णी देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेले विभागीय वन अधिकारी बापू येडे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्याना वन्य प्राणी इत्यादी विषयी अमूल्य अशी माहिती दिली. इको प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन्य प्राणी मानव संघर्ष यावर मार्गदर्शन करतांना जंगल भटकंती आणि वन्यप्राण्यांच्या सुटकेच्या प्रक्रियेत येणारे थरारक अनुभव विद्यार्थ्याना सांगितले. अध्यक्षस्थानाहून बोलतांना प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राणीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले तसेच सहभागी विद्यार्थ्याना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अतिथींचा सत्कार सन्मानचिन्ह प्रदान करून यावेळी प्राचार्याच्या हस्ते करण्यात आला.
वन्य जीव सप्ताहाचे औचित्य साधून प्राणीशास्त्र विभागातर्फे भित्तीचित्र आणि रांगोळी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. वन्य जीवांचे संवर्धन आणि संरक्षण तसेच वातावरणातील बदलाचा वन्य जीवावर होणारा परिणाम या विषयांना धरून आयोजित या स्पर्धेला विद्यार्थांनी भरघोस प्रतिसाद दिला. डॉ. अजय बेले यांच्या मार्गदर्शनात आयोजित पोस्टर व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेचे संचालन प्रा. श्रध्दा मेश्राम, प्रास्ताविक डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी तर आभार प्रदर्शन प्रा. संदेष पाथर्डे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष सौ. सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे , सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोशाध्यक्ष संदीप गड्डमवार, व सन्माननीय सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेष पटेल, तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ स्वप्निल माधमशेटीवर यांनी प्राणीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुषमा प्रजापती, प्रा. पूजा झनके, प्रा. राखी परसुटकर, प्रमोद नारळे, गुरूदास शेंडे सौ. सुवर्णा कुलटे, तसेच प्राणीशास्त्र पदवी व पद्व्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*