Home
Home चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले साई पादुकांचे दर्शन.

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले साई पादुकांचे दर्शन.

0
122

आवो साई पालखी सेवा समितीच्या वतीने साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन.

HELLO CHANDA NEWS

     चंद्रपूर.(का. प्र.) : शहरात श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. शहरात सकाळपासूनच जय साईनाथचा गजर सुरू होता.

               या भक्तिमय वातावरणात सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवून श्री साई पादुकांचे दर्शन घेत साईबाबांच्या चरणी चंद्रपूर जिल्ह्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

                       यावेळी आवो साई पालखी सेवा समितीचे अध्यक्ष रवी अल्लेवारदाताळा देवस्थानचे संस्थापक राजू नागरकरभारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरयुवती प्रमुख प्रियंका चिताडेजितेंद्र इतगीरवारनकुल वासमवार यांच्यासह आवो साई पालखी सेवा समिती  आणि मंदिर समितीच्या विश्वस्तांची उपस्थिती होती.

            यावेळी आमदार जोरगेवार यांनी साईबाबांच्या पादुकांचे पूजन करत साईबाबांच्या शिकवणीत दडलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले कीसाईबाबांचे तत्त्वज्ञान हे श्रद्धासबुरी आणि मानवतेचे प्रतीक आहे. साईबाबांनी शिकवलेला प्रेमएकता आणि सेवा यांचा मार्ग आजच्या समाजाला एकत्र ठेवणारा आहे. अशा सोहळ्यांमधून समाजात भक्तीसौहार्द आणि सकारात्मकता वाढते.

                    आवो साई पालखी सेवा समितीचंद्रपूर आणि दाताड देवस्थान यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला शहरातील हजारो साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी साई पादुकांची मिरवणूक निघाली. ढोल-ताशेफुलांची उधळणसाईनाथ महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आमदार जोरगेवार यांनी या मिरवणुकीत सहभागी होत भक्तांशी संवाद साधला.

                या सोहळ्यामुळे चंद्रपूर शहर भक्तीप्रेम आणि ऐक्याच्या वातावरणाने उजळून निघाले होते. पादुकांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर फुलांची आरास करण्यात आली होती. हजारो भक्तांनी दर्शन घेत साईबाबांच्या कृपेचा लाभ घेतला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही साईबाबांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होत सर्व चंद्रपूरकरांच्या आरोग्यप्रगती आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here