Home
Home चंद्रपूर गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी नातं जपणारी पवित्र परंपरा – आ....

गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी नातं जपणारी पवित्र परंपरा – आ. किशोर जोरगेवार.

0
108

भारतीय जनता पार्टी आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोवर्धन पूजा महोत्सव. 

HELLO CHANDA NEWS

       चंद्रपूर. (का. प्र.) : भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजाशी जोडलेली आहे. समाजातील प्रत्येक घटक आनंदीसमृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावाहा आमचा प्रयत्न आहे. गोवर्धन पूजा ही शेतीगोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देते.

                 या परंपरेत आपल्या संस्कृतीचे मूळ दडले आहेअसे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

                      दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थानेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

                   या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरओबीसी नेते अशोक जिवतोडेमहानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमहिला मोर्चा शहराध्यक्षा छबु वैरागडेमाजी महापौर अनिल फुलझेलेभाजप नेते प्रकाश देवतळेनामदेव डाहुलेयुवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट,  महामंत्री रवी गुरुनुळेमंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरेअॅड. सारिका संदुरकरप्रदीप किरमेरवी जोगीसुभाष अदमानेओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेडकीमाजी नगरसेविका वनिता डुकरेपुष्पा उराडेशीतल गुरुनुलेमाजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरेकानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेचे उमेश साळुंखेजनार्धन भुजाडेराजू सांळुखेराजकुमार भगाडेसागर वाजेकरश्रावण गदई आदी मान्यवर उपस्थित होते.

               यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीगोवर्धन पूजा म्हणजे श्रद्धाएकोपा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपला समाज एकत्र राहिला तर कोणतीही अडचण मोठी ठरत नाही. आज आपल्या देशात आणि राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर सामाजिक एकोपाधार्मिक सौहार्द आणि सांस्कृतिक जपणूकही तितकीच आवश्यक आहे. अशा पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेमसद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो.

          आज या पूजेत इतक्या मोठ्या संख्येने नागरिककार्यकर्तेमहिला व युवा सहभागी झालेहे पाहून आनंद होत आहे.

                 या आयोजनाने समाजात ऐक्यभक्ती आणि सेवा भाव निर्माण केला आहे. आपण सर्वांनी दीपावलीच्या या शुभ पर्वावर मनातील अंधार दूर करून ज्ञानप्रेम आणि एकतेचा प्रकाश पसरवून समाजातील प्रत्येक माणूस आनंदी राहावायासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

                  या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पूजन करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here