Home
Home चंद्रपूर घुग्घूसमध्ये उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहिर सभा.

घुग्घूसमध्ये उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहिर सभा.

0
84

 

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर, (का. प्र.) : घुग्घूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

     या पार्श्वभूमीवर उद्या, शनिवार दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता घुग्घूस येथील फटाका मैदानावर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या  भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

    या विशेष सभेत घुग्घूसच्या आगामी पाच वर्षांसाठीच्या विकासदृष्टीचा सविस्तर आराखडा सादर करण्यात येणार आहे. भाजपच्या पारदर्शक कामकाजाची, विकासकेंद्रित दृष्टिकोनाची आणि नागरिकांप्रती कटिबद्धतेची माहिती या सभेतून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. नागरिक आणि नेतृत्व यांच्यातील हा थेट संवाद घुग्घूसच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवे बळ निर्माण करणार आहे. या सभेला राष्ट्रिय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here