HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.): सरदार पटेल महाविद्यालयामध्ये वीर बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात साहिबजादे गुरु गोबिंदसिंह महाराजांच्या वीर पुत्रांचे स्मरण करून करण्यात आले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरदार पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी. जे. खैरवार यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद कुचनकर व प्रा. सतीश खोब्रागडे उपस्थित होते.
अध्यक्षांनी आपल्या मनोगतात वीर बालकांचे शौर्य, त्याग व देश प्रेम याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की लहान वयातही देश, धर्म व सत्यासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण व विचारमंथन सादर करून वीर बालकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शीतल एम. कटकमवार यांनी केले तर प्रा. तुषार आवळे यांनी आभार मानले.

























