Home चंद्रपूर महायुतीसाठी मोठा निर्णय; गणेश महल्ले नगरसेवक पदाचा अर्ज घेतला मागे..
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोढे यांच्या थेट फोन व आदेश दिल्या नंतर युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश महल्ले यांनी आज नगरसेवक पदाच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतला.
या मधे मुख्य भूमिका किरण पांडव आणि हर्षल शिंदे यांनी
मनधरणी केली या प्रसंगी जिल्हा प्रमुख युवराज धनोरकर शैलेश केळझरकर उपस्थित होते.
यावेळ निर्णायक पाऊल उचलण्यात आले. नेतृत्वाने स्पष्ट संदेश देत सांगितले की,
“गणेश, तू पक्षासाठी लढणारा योद्धा आहेस. पूर्ण ताकदीने काम कर; आम्ही तुझ्या पाठीशी ठाम आहोत. महायुतीला प्रत्येक जागेवर विजय मिळवून द्यायचा आहे.”
या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीची एकजूट आणि आक्रमक रणनीती पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*