Home चंद्रपूर वरोरा तहसिल कार्यालयातील सेतु केंद्र वाऱ्यावर…! करारामध्ये महिला / पुरुष उल्लेख नसतांना...
इतर तालुक्यात पुरुष ऑपरेटर कार्यरत.
HELLO CHANDA NEWS
वरोरा.(वि. प्र.) – शासनाच्या वतीने संपुर्ण महाराष्टातील तहसिल कार्यालयात अनेक वर्षापासुन सेतु केंद्र चालु आहे. सदर सेतु केंद्र हि तहसिलदार किंवा कंत्राटदार यांचे मार्फत चालविण्यात येत आहे. सध्यास्थितीत चंद्रपुर जिल्हयातील सेतु केंद्राचा कंत्राट हा महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपुर यांचे कडे सन 2017 पासुन आहे.
परंतु सदर महामंडळाने स्वत: सेतु केंद्र न चालवता इतर संस्थेला चालविण्याकरीता दिले आहे. तसेच वरोरा येथील सेतू केंद्र सावित्री लोकसंचालीत साधन केंद्र वरोरा यांना देण्यात आला आहे .
सदर महामंडळा सोबत झालेल्या करारामध्ये सेतु ऑपरेटरसह सेतु चालविण्याकरिता देण्यात येत असल्याचे नमुद असतांना सुध्दा वरोरा सेतु केंद्रातील दोन पुरुष ऑपरेटर यांना काढण्यात आले तर एका ऑपरेटरने राजिनामा दिला असुन सध्या सेतु केंद्र वा-यावर असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
तहसिल कार्यालयातील सेतु केंद्रामध्ये विविध प्रमाणपत्र काढण्याची गर्दी होत असते अश्यातच नविन महिला ऑपरेटर यांना नियुक्ती केली असुन कुठल्याही प्रमाणत्रासंबंधी व शासन निर्णयासंबधी पुरेसी माहिती नसल्यामुळे कार्यालयामध्ये प्रमाणपत्र काढण्याकरिता येण्या-या नागरीकांची गैरसोय होवून त्यांचे काम वेळेत होणार नसल्याची शक्यता नाकाराता येत नाही. महाराष्ट शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 14/02/2025 च्या शासन निर्णयाप्रमाणे सेतु केंद्राचा कंत्राट तिन वर्षाकरीता देण्यात यावा तथापि काहि अपरिहार्य कारणामुळे नविन निविदा प्रक्रिया राबवणे शक्य न झाल्यास सदर करारास प्रत्येक वेळेस एक वर्ष या प्रमाणे कमाल दोन वेळा मुदतवाढ देता येईल. असे शासन निर्णयात नमुद असतांना सुध्दा सन 2017 पासुन एकुण 9 वर्षे एकाचा महामंडळाकडे कंत्राट आहे.
ज्या अर्थी 5 वर्षा करीता एकालाच कंत्राटदेता येत असल्याचे नमुद असतांना 9 वर्षे एकालचा कंत्राट का ? असा प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे शासन निर्णयाची अवहेलना होत. असल्याचे दिसुन येत आहे. करीता चंद्रपुर जिल्हयातील सेतु केंद्राच्या कंत्राटाची नविन निवदा प्रक्रिया पार पाडण्यात येवुन संस्था किंवा वयक्तीक संस्था यांना सदरचा कंत्राट देण्याची मागणी येथील नागरीकांकडुन केली जात आहे.
सेतूच्या करारामध्ये महिला / पुरुष उल्लेख नसतांना पुरुषांना कामावरून काढणे चुकीचे आहे.
याबाबत संपूर्ण जिल्ह्यातील पुरुष ऑपरेटर च्या वतीने न्यायालयात दाद मागणार. 



*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*