Home
Home चंद्रपूर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची एकत्रित बैठक..!

सर्व नेत्यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची एकत्रित बैठक..!

0
181

नवीन नगरसेवकांचा सत्कार, जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान.

HELLO CHANDA NEWS

                  चंद्रपूर,(का. प्र.) : भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व नव-निवाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक काल रविवारी शहरातील एन.डी. हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी एकमताने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

       या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                      महाराष्ट्रासह चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भाजप 23 तर मित्र पक्ष १ असे एकूण २४ जागांवर महायुतीने विजय मिळविता आला आहे. जरी हा आकडा बहुमतापासून काहीसा दूर असला, तरी काँग्रेस पक्षालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत असताना, भारतीय जनता पार्टी मात्र एकजुटीने आणि शिस्तबद्धपणे पुढे जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

      रविवारी झालेल्या या बैठकीला निवडून आलेले सर्व २४ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नव-निवाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला, तसेच पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला.

               बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांनी सांगितले की, निवडून आलेले सर्व नगरसेवक पूर्ण क्षमतेने, समर्पित भावनेतून आपल्या-आपल्या प्रभागातील विकासकामे करतील. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करत प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नगरसेवक सतत कार्यरत राहतील.

         यावेळी झालेल्या एकत्रित भाषणात नेत्यांनी स्पष्ट केले की, “भाजपचा प्रत्येक नगरसेवक हा केवळ प्रतिनिधी नसून जनतेचा सेवक आहे. पक्ष संघटना, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप एकसंघपणे काम करणार आहे. चंद्रपूर शहरात स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. या बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी महापालिका राजकारणात भाजपची भूमिका अधिक आक्रमक आणि निर्णायक राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here