Home
Home चंद्रपूर अथक परिश्रम घेणाऱ्यांना सन्मान नाही: रामू तिवारी.

अथक परिश्रम घेणाऱ्यांना सन्मान नाही: रामू तिवारी.

0
285

जास्तीत जास्त नगरसेवक  विजय वडेट्टीवार सोबत जाणार.!

HELLO CHANDA NEWS

   चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी 13 नगरसेवकांना एका लाज मध्ये लॉक करून ठेवल्याचे खळबळजनक आरोप केले असून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्यांना सन्मान ही मिळत नाही असे देखील रामू तिवारी यांनी स्पष्टपणे सांगितल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यशैलीबद्दल वेगळीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे, हे मात्र विशेष!

  चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी अथक परिश्रम घेऊन अनेक नगरसेवक निवडून आणले दुर्दैवाने ते पडले परंतु मागील अनेक वर्षांपासून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी जी मेहनत त्यांनी घेतली त्याचेच परिणाम महानगरपालिकेच्या या निवडणुकीत सकारात्मक निघाले असे म्हणता येईल.

   निवडणुकीच्या तोंडावर त्यांना चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त करून संतोष लहामगे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तरी पण रामू तिवारी यांनी प्रामाणिकपणे पक्षाला साथ देत सर्वकाही विसरून आपले नगरसेवक कसे निवडून येतील व त्यांना आपण उमेदवारी कशी मिळवून देऊ यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते हे मात्र विशेष!

    निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवकांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यवतमाळ मधील एका हॉटेलमध्ये लॉकअप करून ठेवले असल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केला विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांचे कट्टर समर्थक असलेले रामू तिवारी यांनी अचानक विरोधी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात फार मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त होत आहे.

           रामू तिवारी यांनी सांगितले की नगरसेवकांना रॅली मधून बोलविण्यात आले महिला सदस्य यांना ही रॅलीमध्ये पकडून घेण्यात आले हे कृत्य योग्य नाही असे देखील त्यांनी सांगितले.

          काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून  महानगरपालिका मध्ये सत्ता बसवायला पाहिजे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवक पळविले काय या बाबत विचारले असता ते सर्व नगरसेवक स्वइच्छेने विजय भाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत आहे. व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक नगरसेवकाला जर वन टू वन विचारणा केली तर सर्वाधिक नगरसेवक विजय भाऊ वडेट्टीवार यांचे समर्थन करतील व त्यांच्यासोबतच राहतील असे देखील त्यांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात रामू तिवारी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सर्वत्र होत असून विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व सर्व नगरसेवकांना मान्य आहे या बाबत ही कमालीची चर्चा होत असल्याने सक्षम व कणखर नेता म्हणून त्यांचे कौतुक कार्यकर्त्याकडून केले जात आहे, हे मात्र विशेष!

      चंद्रपूर शहर महानगरपालिका मध्ये काँग्रेसने सत्ता बसवायलाच पाहिजे हेकेखोरपणा, व्यक्तिगत हेवे – दावे सोडून सामंजस्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रश्न निकाली काढावा व चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करावी असे बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here