Home
Home Health वरोरा पोलिसांनीं केला माधेळी येथील मोबाईल शॉपी मधील धाडशी चोरी प्रकरणाचा परदाफाश,...

वरोरा पोलिसांनीं केला माधेळी येथील मोबाईल शॉपी मधील धाडशी चोरी प्रकरणाचा परदाफाश, गुन्हेगारास अटक..!

0
257

HELLO CHANDA NEWS

                              वरोरा,(वि. प्र.) : सदर प्रकरणाची थोडक्यात माहीती अशी की, दि. ०५/०१/२०२६ रोजी फिर्यादी, शंकर नागोराव क्षिरसार रा. मांढेळी यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे रिपोर्ट दिला की, त्याचे लारा मोबाईल शॉप येथे रात्री चे वेळी दुकाणाचे शटर तोडुन अज्ञात आरोपीतांनी चोरी करुन दुकाणातील दोन लॅपटॉप कि.अ. ३०,००० रुपये व नगदी ८०,००० रुपये असा उकुन १,२०,००० रुपयाचा मुददेमाल चोरी केल्या बाबत  तक्रार दिली. वरुन पोलीस स्टेशन वरोरा येथे अप.क्र.०६/२०२६ कलम ३३१ (४) ३०५ बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

       घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशन येथिल तपास पथक याना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सपोनी शरद एस. भस्मे,, पोहवा /२२४४ दिलीप सुर, पोहवा संदिप मुळे / २५७१, पोका, विशाल राजुरकर, महेश गावतुरे ब.न.२६४३, पोअ./सौरभ कुलये ब.न. १०५३, यांनी तपासाची चक्रे फिरवुन पो.स्टे. परीसरातील सी. सी.टि.व्ही फुटेजची वरोरा शहरात पाहनी केली जवळपास १०० चे वर वरोरा शहरातील दुकाणचे व घरांचे सी.सी. टी.व्ही. फुटेज पाहनी करुन, गोपनीय माहितीचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी कशोसीने तपास केला असता सदरचा गुन्हा वरोरा येथे राहणारा हर्षद राहुल पेटकर व त्याचे साथिदारासह केल्याचे तपासात दिसुन आले वरुन आरोपी हर्षद राहुल पेटकर रा. वरोरा यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली व त्याचे कडुन चोरी गेलेले दोन लॅपटॉप व कि.अ.३०,००० रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल कि.अ.५०,००० रुपये असा एकुन ८०,००० रुपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

 सदरची कारवाई, पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. संतोष बाकल उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, यांचे नेतृत्वात सपोनी शरद एस. भस्मे, पोहवा /२२४४ दिलीप सुर, पोहवा संदिप मुळे / २५७१,, पो. अं/. महेश गावतुरे ब.न.२६४३, पोअ./सौरभ कुलथे ब.न. १०५३, यांनी केली आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here