Home
Home चंद्रपूर तेलगू समाजाच्या सांस्कृतिक, पारंपरिक उत्सवाचे केंद्रस्थान असलेल्या मैदानाचा विकास करणार – आ. किशोर जोरगेवार..! ...

तेलगू समाजाच्या सांस्कृतिक, पारंपरिक उत्सवाचे केंद्रस्थान असलेल्या मैदानाचा विकास करणार – आ. किशोर जोरगेवार..! १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा; नकोडा येथे समक्का–सारक्का कार्यक्रमाचे आयोजन.

0
141

HELLO CHANDA NEWS

               

               चंद्रपूर,(का. प्र.) : शहरातील नकोडा परिसरात मोठ्या संख्येने तेलगू भाषिक बांधव वास्तव्यास आहेत. आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत आपण येथे वास्तव्यास आहात, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.

         आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक समक्का–सारक्का उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला विशेष आनंद होत आहे.

                 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले मैदान हे तेलगू भाषिक बांधवांच्या सांस्कृतिक पारंपारिक उत्सवाचे केंद्रस्थान असून, त्याच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    समक्का–सारक्का समिती, नकोडा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने नकोडा येथे समक्का–सारक्का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

            यावेळी नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री नामदेव डाहुले, बृजभूषण पाझारे, आशिष मासिरकर, ममता मोरे, शीतल तोडा, विक्की रंगमपल्लीवार, पराग आक्कुलवार, सादिक शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, येथील तेलगू भाषिक समाज हा सामाजिक बांधिलकी जपणारा, परिश्रमशील आणि एकात्मतेचा आदर्श आहे. शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत आपण मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, भविष्यातही तीच भूमिका कायम राहील.

               नकोडा परिसराचा समग्र व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ते तेलगू भाषिक बांधवांचे केंद्रस्थान आहे.

या केंद्रस्थानाचा विकास होणे ही काळाची गरज आहे.

   त्यामुळे या परिसरातील आवश्यक विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

        नकोडा परिसराचा विकास हे आपले ध्येय असून, रस्ते, सभागृह, मूलभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रम यांसाठी पुढील काळातही लोकहिताची कामे सातत्याने केली जातील.

             आपल्या सहकार्याने आणि विश्वासाने हा परिसर अधिक प्रगत व सुसज्ज करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

     या कार्यक्रमाला समाजबांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here