Home चंद्रपूर चंद्रपूर भाजप महानगर कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर, (का. प्र.) : आज रविवारी संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महानगर च्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण पाहत त्यातील विविध तरतुदी, योजना आणि घोषणांचे सविस्तर निरीक्षण केले. शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग तसेच लघु व मध्यम उद्योगांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींविषयी उपस्थितांनी विशेष उत्सुकता दाखवली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. शेतकरी, युवक, महिला तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी दिलासादायक असून, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मितीवर दिलेला भर देशाच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे.
सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना या अर्थसंकल्पातून सकारात्मक उत्तरे मिळत असून, ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देणारा हा अर्थसंकल्प असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होत असून, जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा अधिक भक्कम होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*