Home
Home चंद्रपूर एकात्म मानववादाचा दीप सदैव प्रज्वलित राहील – आ. किशोर जोरगेवार. पंडित दीनदयाल...

एकात्म मानववादाचा दीप सदैव प्रज्वलित राहील – आ. किशोर जोरगेवार. पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिवादन.

0
156

 

एकात्म मानववादाचा दीप सदैव प्रज्वलित राहील – आ. किशोर जोरगेवार.

पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिवादन.

                     चंद्रपूर,(का. प्र.) : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

 यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

                  या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारमनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टीमहामंत्री सविता दंढारेमहिला महामंत्री सायली येरणेविधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकरनगर सेविका अॅड. सारिका संदुरकरनगर सेवक रॉबिन बिश्वासप्रविण गिलबिलेमंजुशा कासनगोट्टूवारप्रलय मशाखेतरीताहिर हुसेनशंकर दंतुलवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

              यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीपंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद हा विचार आजही समाजजीवनाला दिशा देणारा आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून सर्वसमावेशक विकास साधणेही त्यांची भूमिका आजच्या काळात अधिकच महत्त्वाची ठरते.

     ते पुढे म्हणालेराष्ट्रनिष्ठासाधेपणा आणि समर्पित कार्यशैली यांचा आदर्श पंडितजींनी आपल्या आयुष्यातून घालून दिला.

                  त्यांच्या विचारसरणीने भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करतत्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे असे ते म्हणाले.

                          या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात भाजपा महानगरातील पदाधिकारीकार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here