Home
Home चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे भाजी विक्रेत्या महिलांच्या अडचणींवर तात्काळ उपाय. आ....

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे भाजी विक्रेत्या महिलांच्या अडचणींवर तात्काळ उपाय. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनंतर महापौर-उपमहापौरांची त्वरित पाहणी. महापौरांनी दिले टिळक मैदानात सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्याचे निर्देश. महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता; अडचणी लवकर दूर करण्याचा विश्वास.

0
166

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील व तत्पर भूमिकेमुळे भाजी विक्रेत्या महिलांची प्रसाधनगृहाची समस्या सोडविण्यासंदर्भात ठोस पाऊल पडले आहे.

     आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्या सूचनेनंतर चंद्रपूरच्या नवनियुक्त महापौर व उपमहापौरांनी प्रत्यक्ष भेट देऊन यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

         त्यामुळे भाजी विक्रेत्या महिला तसेच स्थानिक नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

                   गोलबाजारसमोरील टिळक मैदान परिसरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांना प्रसाधनगृहाची मोठी अडचण भेडसावत होती.

या समस्येबाबत अनेक महिलांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती.

      याची दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवार, १३ फेब्रुवारीला दोघांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुसज्ज प्रसाधनगृह उभारण्याचे निर्देश दिले. महिलांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांनी घेतलेल्या या निर्णयाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

             या पाहणी दौऱ्यात महामंत्री महापौर संगीता खांडेकर,उपमहापौर प्रशांत दानव, महिला महामोर्चा अध्यक्ष छबुताई वैरागडे, नम्रताताई ठेमस्कर, बंडू गौरकार, सुनीता जयस्वाल, सविता सरकार, कल्पना बागुलकर, सुषमा नागोसे, धनराज कोवे,आशा आबोजवार, स्वच्छता अधिकारी, महानगरपालिका अभियंता आदींची उपस्थिती होती.

   गोलबाजार परिसरात दररोज मोठ्या संख्येने भाजी विक्रेत्या महिला व्यवया मागणीची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने महापौर आणि उपमहापौरांना आवश्यक निर्देश दिले.

      त्यानुसार महापौर. संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला.

     त्यांच्या अडचणी समजून घेत सुसज्ज व स्वच्छ प्रसाधनगृह उभारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून महिलांना दिलासा देण्यावर भर देण्यात आला.

        या सकारात्मक निर्णयामुळे भाजी विक्रेत्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे. त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार, महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव यांचे मनःपूर्वक आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.   

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here