HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(वि.प्र.): गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणात प्रवेश नाही टिकिट नाही असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी करार काही दिवसापूर्वी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 ड गटातून अजय यांना उमेदवारी नाकारली व रॉबिन विश्वास यांना उमेदवारी दिली .
रॉबिन विश्वास यांना किशोर जोरगेवार यांनी भाजप ची तिकीट तर दिलीच तसेच गुंडगिरी करणाऱ्यांना हटवा त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन केल्याने या प्रभागातील बुद्धिजीवी मतदारांनी गुंडगिरी प्रवृत्तीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवली असे ही म्हणता येईल.
रॉबिन विश्वास यांना या प्रभागातून 3343 मते मिळाली व अपक्ष अजय सरकार यांना 2634 मते मिळाली परंतु अजय सरकार यांचे वर्चस्व या प्रभागातून संपले असून तब्बल 709 मतांच्या फरकाने ते पराभूत झाल्याने या प्रभागातील नागरिक सुखावले असे म्हणता येईल.
परंतु अजय सरकार हे या प्रभागातून पराभूत झाल्याने अनेकांना त्यांनी पाहून घेण्याची धमकी दिल्याने या प्रभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अजय सरकार यांना त्यांची योग्य जागा दाखवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करा आवार घाला अशी मागणी या परिसरातून होऊ लागली आहे.
अजय सरकार हे छातीठोकपणे माझ्यावर इतके गुन्हे आहे असे प्रसारमाध्यमांना सांगताना दिसले अनेक गंभीर असे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून ही शोकांतिका अशी की तो खुले आम फिरत आहे लोकांना भीती दाखवत आहे परंतु भीतीपोटी वॉर्डातील नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी घाबरतात अशी धक्कादायक माहिती मिळाली असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला अखेर आशीर्वाद कोणाचा आहे की?
ते पोलिस विभागाला ही न घाबरता अनेक लोकांना चॅलेंज करत फिरत आहे, एवढी मोकळीक अखेर अजय सरकार याला कोण दिली कोणाच्या भरवश्यावर ते मोठ मोठे आरोप ही नेत्यावर करत फिरु लागला आहे. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे एकीकडे पोलिस विभाग गुन्हेगारी प्रवृत्तीला संपवण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे सांगितले जाते तर अनेक गंभीर असे गुन्हे अजय सरकार यांच्यावर असताना पोलिस विभाग कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी अशा या व्यक्तीवर विशेष कारवाई केव्हा करणार व अजय सरकार याला त्याची जागा केव्हा दाखवणार या बाबतची चर्चा संपूर्ण परिसरात होऊ लागली असून वॉर्डातील सुजान नागरिकांकडून अजय सरकार हटाव प्रभाग बचाव ची मोहीम सुरू होणार असे देखील बोलले जात आहे,हे मात्र विशेष! पुढे पुढे पाहू होणार तरी काय स्वतःला वाचविण्यासाठी अजय शोधणार कोणते उपाय?

























